Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohammed Shami : “मोहम्मद शमीने रोजा न पाळून गुन्हा केलाय, त्याला…”; एनर्जी ड्रिंक प्यायल्याने मौलानांचा संताप

मोहम्मद शमी मैदानावर सरबत पिताना दिसला होता. यावर ऑल इंडिया मुस्लीम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष व बरेलीचे मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी आक्षेप घेतला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 06, 2025 | 08:12 PM
“मोहम्मद शमीने रोजा न पाळून गुन्हा केलाय, त्याला…”; एनर्जी ड्रिंक प्यायल्याने मौलानांचा संताप

“मोहम्मद शमीने रोजा न पाळून गुन्हा केलाय, त्याला…”; एनर्जी ड्रिंक प्यायल्याने मौलानांचा संताप

Follow Us
Close
Follow Us:

इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी एनर्जी ड्रिंक पिताना दिसला होता. मात्र रमजानमध्ये त्याने हे एनर्जी ड्रिंक  प्यायल्याने उत्तर प्रदेशमधील बरेलीचे मौलाना शाहबुद्दीन रझवी त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. त्याने शरीयतनुसार मोठा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्याला माफी मागावी लागेल, असं त्यांनी म्हलटं आहे.

त्यांचं म्हणणं आहे की शमीने रमजानच्या महिन्यात रोजा पाळलेला नाही. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी तो मैदानात एनर्जी ड्रिंक पिताना दिसला होता. रझवी म्हणाले, “त्याने जाणून बुजून रोजा पाळलेला नही. हा खूप मोठा गुन्हा आहे. शरीयतच्या नियमानुसार शमी गुन्हेगार आहे”. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नुकताच आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील उपांत्य सामना भारत व ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान, भारताची गोलंदाजी चालू असताना मोहम्मद शमी मैदानावर सरबत पिताना दिसला होता. यावर ऑल इंडिया मुस्लीम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष व बरेलीचे मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी आक्षेप घेतला आहे.

#WATCH | Bareilly, UP: President of All India Muslim Jamaat, Maulana Shahabuddin Razvi Bareilvi says, “…One of the compulsory duties is ‘Roza’ (fasting)…If any healthy man or woman doesn’t observe ‘Roza’, they will be a big criminal…A famous cricket personality of India,… pic.twitter.com/RE9C93Izl2

— ANI (@ANI) March 6, 2025

रझवी यांनी म्हटलं आहे की “इस्लाममध्ये रोझा पाळणं कर्तव्य आहे. एखादी व्यक्ती जाणून बुजून रोजा पाळत नसेल तर तो अट्टल गुन्हेगार आहे. मोहम्मद शमीने रोजा पाळला नाही. मुळात ते त्याचं कर्तव्य आहे. रोजा न पाळून मोहम्मद शमीने मोठा गुन्हा केला आहे. शरीयतच्या नियमानुसार तो मोठा गुन्हेगार आहे. त्याला आता माफी मागावी लागेल.”

शमीला माफी मागावी लागेल

शाहबुद्दीन रझवी म्हणाले, “मोहम्मद शमीने असं करायला नको होतं. मी त्याला सल्ला देतो की इस्लामचे जे नियम आहेत ते त्याने पाळायला हवेत. त्याने क्रिकेट खेळावं, त्याला हवी ती कामं करावी, परंतु, अल्लाहने माणसांवर जी जबाबदारी सोपवली आहे ती त्याने पार पाडायला हवी. शमीला या गोष्टी कोणीतरr समजावून सांगितल्या पाहिजेत. शमीने जी चूक केली आहे त्यासाठी त्याला आता अल्लाहची माफी मागावी लागेल.”

मोहम्मद शमीला रोहित पवारांचा पाठिंबा

रझवी यांनी शमीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काही मुस्लीम लोक त्याला समाजमाध्यमांवर ट्रोल करत आहेत. अशात. एमसीएचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार यांनी शमीची बाजू घेतली आहे. पवार म्हणाले, शमी हा एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत भारत देशाचं प्रतिनिधित्व करत आहे. त्याला वाटलं असेल की मी जर रोजा ठेवला किंवा उपवास केला तर याचा माझ्या कामगिरीवर परिणाम होईल आणि त्यामुळे काही चुकीचं घडून भारतीय संघाने सामना गमावला तर तो कधी सुखाने झोपू शकणार नाही, जगू शकणार नाही. तो एक भारतीय आहे. त्याने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे भारताचं प्रतिनिधीत्त्व करताना हा विषय नाही आणला पाहिजे.”

Web Title: Mohammed shami crime break ramadan says maulana shahabuddin razvi as cricketer energy drink in ind vs aus match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 08:03 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Mohammad Shami

संबंधित बातम्या

Ind w vs Aus w: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर! हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा
1

Ind w vs Aus w: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर! हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव
2

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव

मोहम्मद शमी कसोटी क्रिकेटला फुलस्टॉप? BCCI कडून मोठा खुलासा; वाचा सविस्तर..
3

मोहम्मद शमी कसोटी क्रिकेटला फुलस्टॉप? BCCI कडून मोठा खुलासा; वाचा सविस्तर..

IND vs AUS : 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय…भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
4

IND vs AUS : 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय…भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.