गल्ली क्रिकेटपेक्षाही वाईट अवस्था! (Photo Credit- X)
कोलंबो: २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान क्रिकेटच्या मैदानात एक अत्यंत लाजिरवाणी आणि विचित्र घटना पाहायला मिळाली. मैदानावर डास आणि उडणाऱ्या कीटकांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंना त्रास जाणवत होता. ही समस्या इतकी गंभीर झाली की, अखेरीस सामना १५ मिनिटांसाठी थांबवावा लागला.
सुरुवातीला कमी असलेली कीटकांची संख्या सामना जसजसा पुढे सरकला, तसतशी वाढत गेली. या डास आणि कीटकांच्या त्रासामुळे पाकिस्तानी गोलंदाजांना गोलंदाजी करताना आणि भारतीय फलंदाजांना फलंदाजी करताना डोळ्यांत कीटक जात असल्याने मोठ्या अडचणी येत होत्या.
कोलंबो में मच्छरों का प्रकोप इतना ज्यादा बढ़ गया कि सभी खिलाड़ियों को मैदान से बाहर जाना पड़ा। मैच रोकर फिलहाल फॉगिंग की जा रही है। क्रिकेट के इतिहास में ये शायद पहला मौका है जब मच्छरों की वजह से मैच को रोकना पड़ा है।#INDvsPAK #INDWvsPAKW #WomensWorldCup2025 pic.twitter.com/Qr5Sa3Nkf6 — Rajat Kumar (@RajatKu96119686) October 5, 2025
डासांच्या त्रासाव्यतिरिक्त, पाकिस्तानविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनीही निराशा केली. सलामीवीर स्मृती मानधना (३२ चेंडूत २३ धावा) आणि प्रतिका रावल (३७ चेंडूत ३१ धावा) चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करू शकल्या नाहीत. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही चाहत्यांना निराश केले. तिने ३४ चेंडूंचा सामना करून केवळ १९ धावा काढल्या आणि एक खराब शॉट खेळून ती बाद झाली. त्याचप्रमाणे, हरलीन देओलने ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली असली तरी, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तिने आपली विकेट गमावली. डासांचा त्रास आणि फलंदाजांचे निराशाजनक प्रदर्शन यामुळे भारतीय संघ अडचणीत आल्याचे दिसत आहे.