फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
MS Dhoni Vignesh Puthur Video : मुंबई इंडियन्सकडून सामन्याच्या मध्यभागी एका खेळाडूने आयपीएलमध्ये पदार्पण केले . हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून विघ्नेश पुथूर होता. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध , पहिल्या डावानंतर रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आणि विघ्नेशने प्रभावशाली खेळाडू म्हणून एमआय संघात प्रवेश केला. तो त्याचा पहिला आयपीएल सामना खेळण्यासाठी आला होता. २४ वर्षीय विघ्नेश पुथूरनेही आपला प्रभाव दाखवला. तथापि, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याने ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुड्डा यांच्या विकेट घेऊन सामन्यात एक रोमांचक ट्विस्ट आणला, परंतु रचिन रवींद्र आणि एमएस धोनी यांनी संघाला विजय मिळवून दिला.
कालच्या सामन्यांमध्ये शेवटच्या काही धावा शिल्लक होत्या आणि यावेळी धोनी फलंदाजीला आला होता. आता या सामान्यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, विघ्नेश पुथूरला एमएस धोनीने एक कौतुकाची थाप दिली, जी तो कधीही विसरणार नाही.
खरंतर, जेव्हा रचिन रवींद्र आणि एमएस धोनी चेन्नईसाठी सामना संपवत होते, तेव्हा ते सर्वांशी हस्तांदोलन करत होते. या वेळी विघ्नेश पुथूर मैदानाच्या मध्यभागी एमएस धोनीला भेटतो. एमएस धोनी विघ्नेश पुथूरच्या पाठीवर थाप मारून त्याचे कौतुक करतो. या क्षणाबद्दल बोलताना, माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे समालोचक रवी शास्त्री म्हणाले, “(एमएस धोनीने) तरुण विघ्नेश पुथूरच्या खांद्यावर थाप दिली. मला वाटत नाही की तो हे फार काळ विसरेल.” अर्थात, इथे एमएस धोनी आणि विघ्नेश यांच्यात थोड्याशा गप्पा झाल्या.
MOMENT OF THE MATCH 🤍
Dhoni apprecting & talking with Vignesh Puthur. pic.twitter.com/DFTMeUmsVV
— Johns. (@CricCrazyJohns) March 23, 2025
सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्ये विघ्नेशचा पहिला बळी ठरला. अशाप्रकारे, त्याने ६७ धावांची महत्त्वाची भागीदारी मोडली, ज्यामुळे मुंबईला सामन्यात पुनरागमन करण्यास मदत झाली. त्याच्या पुढच्या दोन षटकांत त्याने शिवम दुबे आणि दीपक हुडा यांना बाद करून मुंबईला पुन्हा सामन्यात आणले. तथापि, मुंबईला त्याचा फायदा घेता आला नाही कारण त्यांना जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांची उणीव भासली . बुमराह दुखापतीमुळे आणि पांड्या बंदीमुळे या सामन्यात खेळला नाही. दुसरीकडे, कर्णधार सूर्यकुमार यादवनेही विघ्नेशचे कौतुक केले आणि त्याला एमआय स्काउट्सचे उत्पादन म्हटले.
चेन्नई सुपर किंग्सचा पुढील सामना २८ मार्च रोजी आरसीबीविरुद्ध खेळवला जाणार आहे. तर मुंबई इंडियन्सचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ३१ मार्चला आयोजित करण्यात आला आहे.