Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: धोनी IPL मधून रिटायरमेंट घेणार? हैदराबादविरुद्ध ‘थाला’ खेळणार शेवटचा सामना? माहिती आली समोर

MS Dhoni IPL Retirement: महेंद्र सिंह धोनी आज आयपीएल २०२६ मध्ये आपला शेवटचा सामना खेळणार असून तो निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 18, 2026 | 01:47 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Close
Follow Us:
  • धोनी IPL मधून रिटायरमेंट घेणार?
  • हैदराबादविरुद्ध खेळणार शेवटचा सामना?
  • धोनीने नेट्समध्ये केला सराव
इंडियन प्रिमियर लीग २०२६ च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेला चेन्नई सुपर किंग्स संघ आज (दि. १८) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. तसेच, हा चेन्नईचा या हंगामातील त्यांच्या घरच्या मैदानावरचा शेवटचा सामनाही असेल. एमए चिदंबरम स्टेडियमवर सर्वांच्या नजरा एकाच व्यक्तीवर असतील ती म्हणजेच एस. धोनी. आयपीएल २०२६ मध्ये एकही सामना न खेळलेला महेंद्रसिंग धोनी सध्या चर्चत आहे. धोनी आज शेवटचा सामना खेळणार तो आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. हंगामाच्या सुरुवातीला धोनीला पोटरीला (Calf Injury) दुखापत झाली होती. यानंतर, तो अंदाजे दोन आठवडे मैदानाबाहेर राहील, अशी माहिती सीएसकेने अधिकृत निवेदनात दिली होती. परंतु ही प्रतिक्षा वाढत गेली. आता, टी२० लीगमधून निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी धोनीला शेवटच्या वेळी मैदानावर खेळताना पाहता यावे, अशी चाहत्यांना आशा आहे.

RCB vs PBKS : ‘किंग’ Kohli चा नवा रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू

थाला IPL मधून रिटायरमेंट घेणार?

२०२१ मध्ये, चेन्नई सुपर किंग्सच्या एका इव्हेंटमध्ये धोनीने (MS.Dhoni)आपल्या संभाव्य निवृत्तीच्या वेळेबद्दल संकेत दिले होते. तो म्हणाला की, ‘मी नेहमीच प्लाननुसार क्रिकेट खेळतो. मी माझा एकदिवसीय क्रिकेटचा शेवटचा सामना रांचीमध्ये खेळलो. त्यामुळे, आशा आहे की, माझा शेवटचा टी-२० सामना चेन्नईमध्ये होईल. तो पुढच्या वर्षी असेल किंवा पाच वर्षांनंतर, हे आम्हाला नक्की माहीत नाही.’ आज हा पाच वर्षांचा काळ संपत असून चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चेपॉकवर सीएसकेचा हंगामातील शेवटचा सामना खेळला जाणार आहे.

Once MS Dhoni said, “Hopefully my last T20 will be in Chennai.” And before that, he mentioned how he has always planned his career — his last ODI in Ranchi, his home ground. So yes, CSK Nation… we can dream. Maybe, just maybe, on 18th May vs SRH, we might witness Thala walking… pic.twitter.com/lnyanIGLFF — sirron tweets💛 (@SirronOfficial) May 16, 2026

धोनीला दुखापतीवर सीएसकेचे निवेदन

आयपीएल २०२६ च्या सुरुवातीलाच धोनीला  पोटरीच्या स्नायूंना दुखापत झाली होती. तेव्हा सीएसकेने (CSK) अधिकृतपणे निवेदन जारी करत म्हटले की, तो दोन आठवडे संघाबाहेर राहील, पण आता सात आठवडे उलटून गेले तरीही धोनी एकाही सामन्यात मैदानावर दिसलेला नाही. सुरुवातीच्या काही दिवसांनंतर तो नेट्सवर परतला असला तरी, तो संघासोबत प्रवास करत नव्हता आणि घरच्या सामन्यांमध्येही डगआऊटच्या बाहेरच राहिला. यामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती.

चेन्नई सुपर किंग्सचे  फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनी आधीच स्पष्ट केले होते की, धोनी नेट्समध्ये चांगली फलंदाजी करत होता. मात्र, खरी चिंता त्याच्या फिटनेसची होती. मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले की, त्याला लवकरात लवकर संघात परत आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एका सराव सामन्यात त्याची दुखापत वाढली. सीएसकेने लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धच्या सामन्यासाठी धोनीची विमानाची तिकिटे बुक केली होती, परंतु धोनीने शेवटच्या क्षणी प्रवास करण्यास नकार दिला होता.
नेट्समध्ये धोनीचा सराव

धोनीने नेट्समध्ये केला सराव

हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनीने नेहमीप्रमाणे सराव केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी पॅड्स घालून एमए चिदंबरम स्टेडियममधील ड्रेसिंग रूममधून बाहेर पडला. इनडोअर एरिनामध्ये एकट्याने वॉर्म-अप केल्यानंतर, त्याने काही स्ट्रेचिंग-व्यायाम केले. यानंतर, त्याने नेट्समध्ये ३० मिनिटे फलंदाजी केली. त्याने थ्रो-डाउन स्पेशालिस्ट आणि नंतर फिरकी गोलंदाजांचा सामना केला. तसेच, आजचा सामना धोनीचा शेवटचा सामना असू शकतो, अशा अफवा पसरु लागल्याने तिकिटांची मागणी पुन्हा वाढली आहे.

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय

Web Title: Ms dhoni last ipl match retirement rumours csk vs srh 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • IPL 2026
  • MS Dhoni Captain

संबंधित बातम्या

IPL 2026: मैदानावरच राडा! राजस्थान रॉयलचा कोच आणि रियान परागचा Live Match ड्रामा, राग चव्हाट्यावर
1

IPL 2026: मैदानावरच राडा! राजस्थान रॉयलचा कोच आणि रियान परागचा Live Match ड्रामा, राग चव्हाट्यावर

DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off  सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव
2

DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव

RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज
3

RR Vs DC Live: राजस्थानचा दिल्लीला ‘तिहेरी’ दणका; ‘या’ खेळाडूंनी मारले मैदान, दिल्लीला 194 रन्सची गरज

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय
4

PBKS Vs RCB Live: पंजाबचा पराभवाचा ‘सिक्सर’! तर Virat च्या ‘आरसीबी’ने केले क्वालिफाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.