Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : CSK च्या चाहत्यांना धक्का! कर्णधारपदाची धुरा घेताच MS DHONI घेणार निवृत्ती… 

आयपीएल 2025 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि  दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना खेळला जाणार आहे.  या सामन्यात धोनी संघाचे नेतृत्व करणार असल्याचे बोलले जाता आहे. तसेच त्याचा शेवटचा सामना असण्याची शक्यता आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 05, 2025 | 10:20 AM
IPL 2025: Shock for CSK fans! MS DHONI to retire as soon as he takes over as captain...

IPL 2025: Shock for CSK fans! MS DHONI to retire as soon as he takes over as captain...

Follow Us
Close
Follow Us:

IPL 20025 : आयपीएल 2025 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि  दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना खेळला जाणार आहे.  संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आजच्या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तर गायकवाडच्या जागी महेंद्रसिंग धोनी संघाची धुरा सांभाळणार असल्याचे बोलेल जात असतानाच सीएसकेच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आजचा सामना शेवटचा असल्याचे बोलले जात आहे. अचानक या सामन्यात धोनी कर्णधार होणार असल्याच्या चर्चेने त्याच्या निवृत्तीबाबत उलट सुलट चर्चा रंगायला सुरवात झाली आहे. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक बाब मानली जात आहे.

मैदनावर नेहमी कूल राहणारा आणि कप्तान कुल म्हणून ज्याची ओळख आहे, असा धोनी गेल्या हंगामात गुडघ्याच्या दुखापतीसह खेळताना दिसून आला.तो आईस पॅड वापरुन मैदानात सराव करत असे. त्याला धावा करण्यात अडचण येत होती. या हंगामात देखील धोनी खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना दिसतो. अशा परिस्थितीत धोनी आपल्या शरीराची प्रकृती लक्षात घेऊन निवृत्तीचा विचार करू शकतो.

हेही वाचा : LSG vs MI: मिशेल मार्शचा मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठा कारनामा! 10 वर्ष जुन्या विक्रमाला लावला सुरंग..

चेन्नईच्या प्रशिक्षकाकडून मोठा खुलासा..

या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला सलग दोन पराभव पत्करावे लागले. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी काही दिवसांपूर्वी धोनीच्या फिटनेसबाबत मोठे विधान केले होते. धोनी आधी सारखा  तंदरूस्त नाही. असे फ्लेमिंगने म्हटले होते. या कारणास्तव, धोनीच्या फलंदाजीच्या क्रमात सामन्याच्या परिस्थितीनुसार बदल करण्यात येतो.  घरच्या मैदानावर आरसीबीविरुद्धच्या सामन्यात धोनी 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलला होता. ज्यामुळे त्याच्यावर जोरदार टीकाही झाली होती.

आयपीएलमध्ये धोनीचा कारनामा

आयपीएलमध्ये धोनीचा नेहमी दबदबा राहिला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्यांमध्ये महेंद्रसिंग धोनी आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत 267 सामने खेळले आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीचे नाव घेतले जाते. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने एकूण पाच वेळा विजेतेपद आपल्या नावे केले आहे. आयपीएल मधील त्याची फलंदाजी बघितली तर त्याने 39.13 च्या सरासरीने 5289 धावा कुटल्या आहेत. यामध्ये त्याने  24 अर्धशतकेही केली आहे. तसेच धोनीचे विकेटकीपिंगही जबरदस्त राहिले आहे.   त्याने 44 स्टंपिंग आणि 152 झेल देखील घेतले आहेत.

हेही वाचा : LSG vs MI : एलएसजीविरुद्ध तिलक वर्मा रिटायर्ड आउट; आयपीएलच्या इतिहासात ठरला चौथा फलंदाज..

सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली त्याने आपल्या संघाला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवले आहे. धोनीची गणना सर्वोत्तम फिनिशर म्हणून करण्यात येते.  हे  त्याने खूप वेळा  सिद्ध केले आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर तीन मोठे विक्रम आहेत जे क्वचितच मोडले जाण्याच्या शक्यता आहे. धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक 226 सामन्यांमध्ये सामन्याचे नेतृत्व केले आहे.  धोनीने 2023 मध्ये चेन्नईला शेवटचे चॅम्पियन बनवले आहे. आयपीएलमध्ये ट्रॉफी जिंकणारा तो सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे.

Web Title: Ms dhoni will retire as soon as he takes over as captain ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 10:20 AM

Topics:  

  • MS Dhoni Captain

संबंधित बातम्या

PHOTOS: आशिया कपच्या इतिहासात INDIA vs PAk मधील ‘हे’ पाच सामने राहिले थरारक; जाणून घ्या कोण ठरले वरचढ..
1

PHOTOS: आशिया कपच्या इतिहासात INDIA vs PAk मधील ‘हे’ पाच सामने राहिले थरारक; जाणून घ्या कोण ठरले वरचढ..

MS Dhoni Birthday special : एमएस धोनीचे ‘ते’ खास ७ माणसं कोण? ज्यांच्यासोबत साजरा केला ४४ वा वाढदिवस; पहा व्हिडिओ
2

MS Dhoni Birthday special : एमएस धोनीचे ‘ते’ खास ७ माणसं कोण? ज्यांच्यासोबत साजरा केला ४४ वा वाढदिवस; पहा व्हिडिओ

RCB Vs LSG : बंगळुरूच्या Jitesh Sharma आयपीएलमध्ये धूमधडाका! MS Dhoni ला पिछाडीवर टाकत आयपीएलमध्ये रचला इतिहास…
3

RCB Vs LSG : बंगळुरूच्या Jitesh Sharma आयपीएलमध्ये धूमधडाका! MS Dhoni ला पिछाडीवर टाकत आयपीएलमध्ये रचला इतिहास…

IPL 2025 : ‘वैभव सूर्यवंशीपुढे मी म्हातारा..’, MS Dhoni ने असं काय बोलून गेला? सर्वांच्या भुवया उंचावल्या.. 
4

IPL 2025 : ‘वैभव सूर्यवंशीपुढे मी म्हातारा..’, MS Dhoni ने असं काय बोलून गेला? सर्वांच्या भुवया उंचावल्या.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.