तिलक वर्मा(फोटो-सोशल मीडिया)
LSG vs MI : काल 4 एप्रिलला इकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना पार पडला. एलसजीने प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर 204 लक्ष्य ठेवले होते. प्रतिउत्तरात मुंबई 5 गडी गमावून 191 धावांपर्यंतच मजल मारू शकली. लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला 12 धावांनी धूळ चारली. या विजयासह एलएसजीने या हंगामातील दूसऱ्या विजयाची नोंद केली तर मुंबईला मात्र तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्मा आऊट न होता तंबूत परतला. त्यानंतर तो रिटायर्ड आउट झाला.
लखनौच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवार, 4 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात निवृत्त होणारा टिळक वर्मा हा आयपीएल इतिहासातील चौथा फलंदाज ठरला आहे. वर्माने धावांची गती कायम राखण्यासाठी खूप संघर्ष केला. त्यांतर मुंबईला शेवटच्या 7 चेंडूत 24 धावांची गरज होती. त्याआधीच तिलक वर्मा 23 चेंडूत 25 धावा करून निवृत्त झाला. अखेर मुंबईला 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागाला.
हेही वाचा : LSG vs MI: मिशेल मार्शचा मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठा कारनामा! 10 वर्ष जुन्या विक्रमाला लावला सुरंग..
नवव्या षटकात टिळक वर्मा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण, तो क्रीजवर धावांसाठी झगडताना दिसून आला. 22 वर्षीय वर्माच्या बॅटवर बॉल येताना दिसत नव्हता. त्यामुळे त्याला माघारी बोलावण्यात आले. त्याचा फटका मुंबईला बसला.
हेही वाचा : IPL 2025 : कॅप्टन कूल रिटर्न! MS Dhoni सांभाळणार CSK चे कर्णधारपद? चाहत्यांमध्ये उत्सुकता…
एलएसजीकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, तो पराभवाची संपूर्ण जबाबदारी घेतो. आम्हाला काही फटके हवे होते. क्रिकेटमध्ये असे क्षण येतात. जेव्हा तुम्ही प्रयत्न करता पण ते यशस्वी होत नाही. जर आपण संघ म्हणून काम करण्याबद्दल बोललो तर आपल्याला चांगले क्रिकेट खेळणे गरजेचे असते. योग्य कॉल घ्यावा लागतो आणि आक्रमकतेने खेळ खेळावा लागते. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 203 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ 5 गडी गमावून केवळ 191 धावाच करू शकला. या विजयासह एलएसजीने या हंगामातील दूसऱ्या विजयाची नोंद केली तर मुंबईला मात्र तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.