T20 सामन्यात 445 धावा; मुंबईच्या संघाने रचला इतिहास, सूर्या आणि श्रेयस अय्यरच्या संघाने मिळवला मोठा विजय
Syed Mushtaq Ali Trophy 2024 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबई संघाने विदर्भाचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात दोन्ही संघांनी खूप धावा केल्या, त्यामुळे एक मोठा विक्रम रचला गेला. या सामन्यात चाहत्यांना 400 हून अधिक धावा पाहायला मिळाल्या.
चौथा उपांत्यपूर्व सामना मुंबई आणि विदर्भ संघांमध्ये
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा चौथा उपांत्यपूर्व सामना मुंबई आणि विदर्भ संघांमध्ये खेळला गेला. चाहत्यांना पुन्हा एकदा या स्पर्धेत उच्च स्कोअरिंग सामना पाहायला मिळाला, जिथे दोन्ही संघांनी भरपूर चौकार आणि षटकार मारले. मात्र, स्टार खेळाडूंनी सजलेल्या मुंबई संघाने अखेर सामना जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. यासह सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील तीन संघ निश्चित झाले आहेत. मुंबईपूर्वी बडोदा आणि मध्य प्रदेशनेही आपापल्या उपांत्यपूर्व फेरीतील सामने जिंकले.
सूर्या आणि श्रेयस अय्यरने रचला इतिहास
Mumbai are into the semis 👏
They ace yet another run chase, chasing down 222 against Vidarbha to win by 6 wickets 🙌
With 60 needed off the last 4 overs, Shivam Dube & Suryansh Shedge pulled off a terrific win 👌#SMAT | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/6VsAOYwAI8 pic.twitter.com/bQ0Ds4J94q
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 11, 2024
मुंबई संघाची संस्मरणीय विजयाची नोंद
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या या महत्त्वाच्या सामन्यात दोन्ही संघांनी २०० हून अधिक धावा केल्या. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांच्या गोलंदाजांना काही विशेष करता आले नाही. प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने 20 षटकांत 6 गडी गमावून 221 धावा केल्या. यादरम्यान अथर्व तायडेने संघाकडून सर्वाधिक ६६ धावा केल्या. त्याचवेळी अपूर्व वानखडेने 33 चेंडूत 51 धावांची खेळी तर शुभम दुबे 19 चेंडूत 43 धावा करून नाबाद राहिला. तर मुंबईकडून अथर्व अंकोलेकर आणि सूर्यांश शेडगे यांनी सर्वाधिक २-२ बळी घेतले.
मुंबईला 120 चेंडूत 222 धावांचे लक्ष्य
हा सामना जिंकण्यासाठी मुंबईला 120 चेंडूत 222 धावांचे लक्ष्य गाठायचं होतं, जे इतक्या मोठ्या सामन्यात अजिबात सोपं नाही. मात्र मुंबईचे सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांनी शानदार फलंदाजी करीत संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 7 षटकांत 83 धावा जोडल्या. यादरम्यान पृथ्वी शॉने 26 चेंडूत 49 धावा केल्या तर रहाणे 45 चेंडूत 84 धावा करून बाद झाला. यानंतर शिवम दुबेने 22 चेंडूत नाबाद 37 धावा आणि सूर्यांश शेडगेने 12 चेंडूत नाबाद 36 धावा करत संघाला विजयापर्यंत नेले.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मोठा विक्रम
या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण 445 धावा केल्या होत्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्यात आलेल्या या 9व्या धावा आहेत. त्याच वर्षी मुंबई आणि आंध्र यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण 448 धावा झाल्या होत्या. त्याचवेळी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही 2924 च्या नावावर होता. त्यानंतर गोवा आणि मुंबईच्या संघाने मिळून सामन्यात एकूण 474 धावा केल्या होत्या.