फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लंड : भारताच्या संघाने संघाने २०२४ मध्ये झालेल्या आयसीसी T२० विश्वचषकामध्ये टीम इंडियाने विश्वचषक नावावर केला आहे. त्यानंतर टीम इंडियाने एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा संघ विशेष कामगिरी करू शकला नाही. पण भारताच्या संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मागील काही मालिकांमध्ये कमालीची कामगिरी केली आहे.
भारतीय संघाने शुक्रवारी पुण्यात जोरदार पुनरागमन करत चौथ्या T२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला. हा विजय सूर्यकुमार ब्रिगेडसाठी आनंदाचा होता कारण यासह भारताने मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली. या विजयासह भारताने घरच्या मैदानावर आपला विश्वविक्रम आणखी मजबूत केला आहे. भारताने घरच्या मैदानावर सलग १७वी T२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली. मेन इन ब्लूने अखेरची T२० आंतरराष्ट्रीय मालिका २०१८/१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात गमावली होती. तेव्हापासून भारत विजयाचे साम्राज्य राहिला आहे.
१) भारत – १७ मालिका*, २०१९ आजपर्यंत
२) ऑस्ट्रेलिया – ८ मालिका, जानेवारी २००६ ते फेब्रुवारी २०१०
३) दक्षिण आफ्रिका – ७ मालिका, २००७ फेब्रुवारी ते २०१० ऑक्टोबर
४) भारत – सहा मालिका, २०१६ फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०१८
५) न्यूझीलंड – ६ मालिका, २००८ डिसेंबर ते २०१२ फेब्रुवारी.
पुण्यातील एमसीए स्टेडियमवर शुक्रवारी खेळल्या गेलेल्या चौथ्या T२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ गडी गमावून १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव १९.४ षटकांत सर्वबाद १६६ धावांत आटोपला. यासह भारताने चालू मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
IND vs AUS : हार्दिक पंड्या टीम इंडियाचा आधारस्तंभ, चौथ्या कसोटीत केला नवा विक्रम
भारत आणि इंग्लंडच्या चौथ्या T२० आंतरराष्ट्रीय सामन्यात कंक्शन सबस्टीट्यूटवरून मोठा वाद झाला होता. भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याच्या हेल्मेटवर चेंडू लागला आणि डाव संपल्यानंतर हर्षित राणा त्याचा बदली खेळाडू म्हणून आला. राणाने तीन इंग्लिश फलंदाजांना आपले बळी बनवले, त्यामुळे पाहुण्या संघाने सामना गमावला.
सामन्यानंतर, इंग्लिश कर्णधार जोस बटलरने कंकशनच्या पर्यायावर प्रश्न उपस्थित केले आणि सांगितले की राणा हा दुबेच्या बदल्यात सारखे कोणीही नाही. बटलर म्हणाला की, आमचा सल्ला घेण्यात आला नाही आणि आमचा यामध्ये कोणताही सहभाग नव्हता. इंग्लिश कर्णधाराने असेही सांगितले की या संदर्भात सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांना काही प्रश्न विचारणार आहेत जेणेकरून त्यांना स्पष्टीकरण मिळू शकेल.