फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा T२० सामना : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने इंग्लंडविरुद्धच्या मधल्या सामन्यात पदार्पण करून अनोखा विक्रम केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना पुण्यात खेळला गेला. या सामन्यात शिवम दुबेला दुखापत झाल्यानंतर, हर्षित राणाला कॉन्सशन पर्याय म्हणून खेळण्याची संधी मिळाली. भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात जेमी ओव्हरटनचा चेंडू दुबेच्या हेल्मेटला लागला. भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा दुबेच्या जागी राणा मैदानात आला. हर्षित राणाने मैदानात उतरताच अनोखा विक्रम केला.
India Vs England 4th T20: भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय; 15 धावांनी पराभव करत मालिका घातली खिशात
T२० मध्ये कंक्शन ऑब्स्टिट्यूट म्हणून पदार्पण करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे असे नाही . एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये असे अनेकवेळा घडले आहे जेव्हा एखाद्या खेळाडूने कॉन्सशन पर्याय म्हणून पदार्पण केले होते, परंतु टी -२० मध्ये ही पहिलीच वेळ आहे.
ब्रायन मुडझिंगान्यामा कसोटी, विरुद्ध श्रीलंका – हरारे २०२०
नील रॉक ODI, विरुद्ध वेस्ट इंडिज – किंग्स्टन २०२२
खाया झोंडो कसोटी, विरुद्ध बांगलादेश – गेबरहा २०२२
मॅट पार्किन्सन कसोटी, विरुद्ध न्यूझीलंड – लॉर्ड्स २०२२
कामरान गुलाम ODI, विरुद्ध न्यूझीलंड – कराची २०२३
बहीर शाह कसोटी, विरुद्ध बांगलादेश – मीरपूर २०२३
हर्षित राणा T20I, विरुद्ध इंग्लंड पुणे २०२५
Chopped 🔛
Wicket No. 3⃣ for Harshit Rana! 👌 👌#TeamIndia a wicket away from a win!
Follow The Match ▶️ https://t.co/pUkyQwxOA3#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/yEf4COEGA7
— BCCI (@BCCI) January 31, 2025
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने शिवम दुबे आणि हार्दिक पंड्याच्या अर्धशतकांच्या जोरावर १८१ धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना खातेही उघडता आले नाही, तर संजू सॅमसननेही १ धाव काढली. एकवेळ भारताने ७९ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर हार्दिक आणि दुबे यांनी ५३-५३ धावांची खेळी करत संघाला या धावसंख्येपर्यंत नेले.
१८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात दमदार झाली. पॉवर प्लेमध्ये संघाने १ गडी गमावून ६२ धावा फलकावर लावल्या होत्या, परंतु फिरकी गोलंदाजांच्या आक्रमणावर येताच पाहुण्या संघाची पिछेहाट होऊ लागली. हर्षित राणाने तीन विकेट घेत उर्वरित काम पूर्ण केले. इंग्लंडला पूर्ण २० षटकेही खेळता आली नाहीत आणि १९.४ षटकांत संपूर्ण संघ १६६ धावांवर आटोपला. दुबेला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.