
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
डेव्हॉन कॉनवे टॉम लॅथम ओपनिंग पेअर: न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात कधीही न पाहिलेले यश मिळवले आहे. माउंट मौंगानुई येथील बे ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम या जोडीने इतिहास रचला. डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम ही जोडी एकाच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके करणारी पहिली सलामी जोडी ठरली.
खरं तर, गेल्या १४८ वर्षांत कोणत्याही संघाच्या दोन सलामीवीरांनी अशी कामगिरी केलेली नाही. डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम या सलामी जोडीने सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावून ऐतिहासिक कामगिरी केली. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीरांनी (डेव्हॉन लॅथम आणि डेव्हॉन लॅथम) एकत्रितपणे ३२३ धावांची मोठी भागीदारी केली. कर्णधार टॉम लॅथमने १३७ धावा केल्या, तर डेव्हॉन कॉनवेने २२७ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर न्यूझीलंडने त्यांचा पहिला डाव ५७५/८ वर घोषित केला.
U19 Asia Cup 2025 : टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या…! समीर मिन्हासने भारताविरुद्ध ठोकले शतक
वेस्ट इंडिजकडून कावेम हॉजने शानदार फलंदाजी केली आणि तो १२३ धावांवर नाबाद राहिला. त्याच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ४२० धावा केल्या.
जेव्हा न्यूझीलंड दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी उतरले तेव्हा कॉनवे आणि लॅथम यांनी पुन्हा इतिहास रचला. डेव्हॉन कॉनवेने १३९ चेंडूत १०० धावा आणि टॉम लॅथमने १३० चेंडूत १०१ धावा केल्या. दोघांनी १९२ धावांची सलामीची भागीदारी केली. शेवटी, केन विल्यमसन (४०*) आणि रचिन रवींद्र (४६*) यांच्या जलद खेळीच्या मदतीने, न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर ४६२ धावांचे लक्ष्य ठेवून ३०६/२ धावांवर डाव घोषित केला.
🚨 ANOTHER RECORD 🚨 For the first time in the history of Test cricket, both openers from one team have recorded hundreds in each innings. Devon Conway and Tom Latham 👏#NZvWI pic.twitter.com/crMZfa0j3M — Cricbuzz (@cricbuzz) December 21, 2025
विजयासाठी ४६२ धावांचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिजने चौथ्या दिवसाचा खेळ बिनबाद ४३ धावांवर संपवला. ब्रँडन किंग ३७ धावांवर फलंदाजी करत आहे. सामना जिंकण्यासाठी आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणण्यासाठी वेस्ट इंडिजला शेवटच्या दिवशी ४१९ धावांची आवश्यकता आहे.
वेस्ट इंडिजने आधीच सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम केला आहे (४१८ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २००३). यावेळी त्यांना ४६२ धावांची आवश्यकता आहे. जर त्यांनी हा धावांचा पाठलाग साध्य केला तर हा त्यांचा २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पहिला विजय असेल.