फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Sameer Minhas century : भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 संघ सध्या आशिया कप 2025 चा फायनलचा सामना खेळत आहेत. भारताच्या संघाने या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकले आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 30 ओव्हरचा खेळ झाला आहे आणि आता भारताच्या संघावर हा निर्णय महागात पडला असे दिसून येत आहे. पाकिस्तानच्या संघाने पहिला विकेट लवकर गमवला पण त्यानंतर पाकिस्तानच्या दोन फलंदाजांची चांगली भागीदारी पाहायला मिळाली. मिन्हास आणि हुसेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या.
२७ षटकांनंतर पाकिस्तानने २ बाद १७४ धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा अंदाजित स्कोअर ३२४ आहे. यामध्ये समीर मिनहासने शतक झळकावले! पाकिस्तानचा सलामीवीर समीर मिनहासने भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात फक्त ७१ चेंडूत शतक झळकावले. हे शतक त्याच्यासाठी संस्मरणीय ठरेल. त्याने आधीच १२ चौकार आणि चार उत्तुंग षटकार मारले आहेत. २९ षटकांनंतर, पाकिस्तानचा स्कोअर २ बाद १९३ आहे.
Sameer Minhas (brother of Arafat Minhas) in the U19 Asia Cup – 177* (148)
– 69* (57) in the semi-final
– 44 (63)
– 9 (20) He is the leading run-scorer of the tournament.⭐️👏 pic.twitter.com/I1qkMItPXS — junaiz (@dhillow_) December 19, 2025
समीर मिनहासने आतापर्यंत या स्पर्धेतील भारताविरुद्धच्या साखळी सामन्याशिवाय सर्व सामन्यात धावा केल्या आहेत. त्याने शेवटच्या चार डावांमध्ये १७७, ९, ४४ आणि ६९ धावा केल्या. या डावात त्याने एका चौकारासह १०० धावा केल्या आणि स्पर्धेत त्याने ४०० धावा केल्या. त्याने १२ चौकार आणि चार षटकार मारून शतक पूर्ण केले. त्याच्याविरुद्ध भारतीय गोलंदाजी निष्प्रभ दिसत होती.
समीरने ७१ चेंडूत शतक ठोकले, ज्यामुळे तो सध्याच्या १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद शतक करणारा फलंदाज ठरला. त्याच्या आधी वैभव सूर्यवंशीने ५६ चेंडूत शतक ठोकले होते, जे या स्पर्धेतील सर्वात जलद शतक ठरले. यादीत तिसऱ्या क्रमांकावर अभिज्ञान कुंडू आहे, ज्याने मलेशियाविरुद्ध द्विशतक ठोकले.
वैभव सूर्यवंशी – ५६ चेंडू
समीर मिन्हास – ७१ चेंडू
अभिज्ञान कुंडू – ८० चेंडू
फैसल शिंझोदा – ९१ चेंडू
अहमद हुसेन – १०२ चेंडू






