फोटो सौजन्य – X (MI New York)
निकोलस पुरनचे शतक : मेजर क्रिकेट लीग 2025 चा आज 18 वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना एमआय न्युऑर्क विरुद्ध सिएटल ऑर्कस यांच्यामध्ये हा सामना पार पडला. एमआय न्युऑर्कचे कर्णधारपद हे निकलस पुरनकडे सोपवण्यात आले आहे. या सामन्यात एमआय न्यू यॉर्क प्रथम फलंदाजी करताना दिसला. आतापर्यंत त्याची फलंदाजीची कामगिरी काही खास राहिलेली नाही. पूरनने पहिल्या ३ सामन्यात एकेरी अंकात धावा केल्या होत्या, परंतु या सामन्यात पूरनची तीच जुनी स्फोटक शैली पाहायला मिळाली.
या सामन्यात पूरनने सिएटल ऑर्कासच्या गोलंदाजांना चकवा दिला आणि हंगामातील पहिले शतकही ठोकले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमआय न्यू यॉर्कने २० षटकांत ४ गडी गमावून २३७ धावा केल्या. यादरम्यान एमआय न्यू यॉर्ककडून कर्णधार निकोलस पूरनने ५५ चेंडूत शतक झळकावले आणि धमाकेदार फलंदाजी केली. ६० चेंडूत १०८ धावा काढल्यानंतर पूरन नाबाद राहिला, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून ८ षटकार आणि ७ चौकार आले.
AUS vs WI : WTC पॉईंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची विजयी सुरुवात! वेस्ट इंडीजला 159 धावांनी केलं पराभुत
पूरन व्यतिरिक्त, तजिंदर ढिल्लननेही अप्रतिम फलंदाजी केली, जरी तो त्याचे शतक हुकला. तजिंदरने फक्त ३५ चेंडूत ९५ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या खेळीदरम्यान तजिंदरने ८ चौकार आणि ८ षटकार मारले, ज्या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २७१ होता. मेजर लीग क्रिकेटमध्ये अमेरिकन फलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.
Runs: 108*
Balls: 60
4s/6s: 7/8
SR: 180Nicholas Pooran doing what he does best 🫡🫡 #MINY #MLC2025 #Cricketpic.twitter.com/RaGAsn7iWj
— Cricbuzz (@cricbuzz) June 28, 2025
एमआय न्यू यॉर्कसाठी कर्णधार निकोलस पूरन आणि तजिंदर ढिल्लन यांनी अप्रतिम फलंदाजी केली. एवढेच नाही तर मेजर लीग क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारीही या दोघांमध्ये पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांमध्ये ६८ चेंडूत १५८ धावांची भागीदारी झाली. त्यानंतर ९५ धावा करून तजिंदर बाद झाला.
निकोलस पुरन याने आयपीएल 2025 मध्ये पहिल्या सुरुवातीच्या काही सामन्यामध्ये धुमाकुळ घातला होता. आयपीएल 2025 मध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 524 धावा केल्या आहेत. या सिझनमध्ये त्याने 5 अर्धशतक झळकावले. त्याने लखनऊ सुपर जायंट्ससाठी या सिझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. त्यानंतर त्याने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृतीची घोषणा केली आहे.