फोटो सौजन्य – X (ICC)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्याचा अहवाल : ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना काल संपला आहे, या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने तिसऱ्या डावामध्ये चांगली कामगिरी केली आणि पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यात यश मिळाले. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना बार्बाडोस येथे खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने हा सामना १५९ धावांनी जिंकला. या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने या विजयासह ऑस्ट्रेलियाने केवळ WTC पॉइंट्स टेबलमध्ये आपले खाते उघडले नाही तर संघ पहिल्या स्थानावर पोहोचला. दुसऱ्या डावात कांगारू गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर कहर केला. एकाच सत्रात वेस्ट इंडिजच्या १० विकेट पडल्या.
दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ एकाच सत्रात १४१ धावांवर ऑलआउट झाला. वेस्ट इंडिजकडून फलंदाजी करताना शमार जोसेफने दुसऱ्या डावात सर्वाधिक ४४ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले. वेस्ट इंडिजचे ७ फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना जोश हेझलवूडने सर्वाधिक ५ बळी घेतले. याशिवाय, नॅथन लायनने २, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी १ बळी घेतला.
Australia win the opening Test at Kensington Oval.#WIvAUS | #FullAhEnergy pic.twitter.com/I1GR2t9Dlr
— Windies Cricket (@windiescricket) June 27, 2025
या सामन्यात विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे WTC पॉइंट टेबलमध्ये १२ गुण झाले आहेत. यापूर्वी इंग्लंडचा संघ १२ गुणांसह पहिल्या स्थानावर होता, कारण इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव केला होता. आता ऑस्ट्रेलिया इंग्लंडला हरवून पहिल्या स्थानावर आला आहे. याशिवाय बांगलादेश तिसऱ्या, श्रीलंका चौथ्या आणि भारत पाचव्या स्थानावर आहे. टीम इंडियाने WTC पॉइंट टेबलमध्ये अद्याप आपले खाते उघडलेले नाही.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी चांगली होती. त्यामुळे संघाने ३१० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना दुसऱ्या डावात ३ फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. यामध्ये ट्रॅव्हिस हे ६१, ब्यू वेबस्टर ६३ आणि अॅलेक्स केरी ६३ धावांचा समावेश होता. याशिवाय मिचेल स्टार्कने १६ धावांची खेळी केली.