फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवीन आदेश : सध्या आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम सुरु आहे, यामध्ये सध्या भारतीय खेळाडू सध्या व्यस्त आहेत. भारताच्या संघाने २०२४ मध्ये झालेल्या T२० विश्वचषक जिंकला आणि संपूर्ण भारतामध्ये त्याचा आनंद साजरा केला. भारताने T२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने T२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला करण्यात आले आहे. भारताचा संघ २०२६ मध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनने खेळाडूंसाठी नवीन आदेश जारी केले आहेत, यासंदर्भात सविस्तर वाचा.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने सूर्यकुमार, श्रेयस अय्यरसह मुंबईतील सर्व खेळाडूंसाठी एक नवीन आदेश जारी केला आहे. एमसीए म्हणते की, आतापासून मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना मुंबई टी-२० लीगमध्ये सहभागी होणे बंधनकारक असेल. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, अजिंक्य रहाणे, सूर्य कुमार, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, पृथ्वी शॉ यांसारख्या खेळाडूंना असा संदेश देण्यात आला आहे की जर त्यांची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली नाही तर त्यांना या लीगमध्ये सहभागी व्हावे लागेल. रोहितला या लीगचा मुख्य चेहरा बनवले जाईल.
🚨 ROHIT SHARMA IS THE FACE OF LEAGUE 🚨
– MCA picks Rohit Sharma as the Face of the League in the T20 Mumbai League. (Express Sports). pic.twitter.com/Rk2y4cV2Qy
— Tanuj (@ImTanujSingh) April 17, 2025
मुंबई क्रिकेट असोसिएशनने सर्व खेळाडूंना टी-२० मुंबई लीगमध्ये खेळणे अनिवार्य केले आहे. भारतीय राष्ट्रीय संघाचा भाग असलेल्या सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे यांच्यासह सर्व खेळाडूंनाही या लीगमध्ये खेळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एमसीएने याबाबत एक निवेदन जारी केले आणि म्हटले की, “मुंबईतील सर्व भारतीय खेळाडूंना कळविण्यात आले आहे की त्यांना टी-२० मुंबई लीगमध्ये खेळावे लागेल. ही लीग आयपीएलनंतर लगेच सुरू होणार आहे, हे अनिवार्य आहे. भारतीय संघाकडून खेळणाऱ्या किंवा दुखापतग्रस्त खेळाडूंनाच सूट दिली जाईल.”
Riyan Parag ची सुपर ओव्हरमध्ये बॅटवरून अंपायरसोबत बाचाबाची! खेळाडू ठरला फेल, Video Viral
एमसीएने म्हटले आहे की या लीगमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक भारतीय खेळाडूला १५ लाख रुपये दिले जातील, जे लिलावात मिळालेल्या पैशांपासून वेगळे असतील. एमसीएने म्हटले आहे की, “भारतीय खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी असोसिएशनकडून स्वतंत्रपणे १५ लाख रुपये दिले जातील. याशिवाय, त्यांना लिलावातून वेगळे उत्पन्न मिळेल. आम्ही मूळ किंमत आणि इतर तपशीलांवर काम करत आहोत.” आगामी लीगमध्ये सहभागी होण्यासाठी सुमारे २८०० स्थानिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे. टी-२० मुंबई लीगचा लिलाव मे महिन्यात होणार आहे. असोसिएशन २६ मे पासून स्पर्धा सुरू करण्याचा विचार करत आहे, ज्याचा विजेतेपद सामना ५ जून रोजी खेळवला जाऊ शकतो.