फोटो सौजन्य – X
आयपीएल 2025 झाल्यानंतर भारतामध्ये त्याचबरोबर परदेशात देखील अनेक लीग सुरु झाले आहेत. आयपीएल 2025 नंतर लगेचच मुंबई प्रिमीयर लीग सुरु झाले होते आता सध्या तामिळनाडू प्रीमियर लीग सुरु आहे. आर. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याला जवळजवळ एक वर्ष झाले आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेदरम्यान त्याने अचानक निवृत्ती घेऊन जगाला आश्चर्यचकित केले. आता हा खेळाडू पुन्हा एकदा चर्चेत आहे. निवृत्तीनंतर, अश्विन चेंडू आणि बॅट दोन्हीने कहर करत आहे.
2 जुलै 2025 रोजी, त्याने बॅटने कहर केला आणि 83 धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. चला जाणून घेऊया अश्विन आजकाल कुठे खेळत आहे. खरंतर, आर अश्विन सध्या तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ मध्ये आपला लौकिक दाखवत आहे. तो डिंडीगुल ड्रॅगन्स संघाचा कर्णधार आहे. ३ जुलै रोजी त्याच्या संघाने त्रिची ग्रँड चोलस संघाचा ६ विकेट्सने पराभव केला. विजयाचा नायक कर्णधार आर अश्विन होता, ज्याने बॅटने ८३ धावा केल्या आणि चेंडूने ३ विकेट्सही घेतल्या.
IND vs ENG : टीम इंडियामध्ये ‘जिजा’ कोण? गौतम गंभीरने केला खुलासा! म्हणाला – 2 वर्षांपासून घरी आला…
या सामन्यात त्रिची ग्रँड चोलस संघाने प्रथम फलंदाजी करत १४० धावा केल्या. आर अश्विनने ४ षटकांत २८ धावा देत ३ बळी घेतले आणि त्रिची ग्रँड चोलस संघाला १४० धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. चोलसकडून सलामीवीर वसीम अहमदने सर्वाधिक ३८ धावा केल्या तर शेवटी वासिफ जाफरने ४ षटकारांसह ३३ धावा केल्या. आता पाठलाग करण्याची पाळी होती. आर अश्विनच्या झंझावाती खेळीच्या जोरावर दिंडीगुल संघाने लक्ष्य सहज गाठले.
Captain. All-Rounder. Match-Winner! 💛
Ravichandran Ashwin leads from the front as Dindigul Dragons storm into Qualifier 2 with a dominant win in the TNPL Eliminator! 💥
That’s four consecutive fifties in TNPL playoffs for Ashwin! 👏#RavichandranAshwin #TNPL2025… pic.twitter.com/MBIUPllbtZ
— Sportskeeda (@Sportskeeda) July 3, 2025
१४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या डिंडीगुल ड्रॅगन्सकडून रविचंद्रन अश्विन डावाची सुरुवात करण्यासाठी आला. त्याने वादळी सुरुवात केली. त्याने ४८ चेंडूत ११ चौकार आणि तीन षटकारांसह ८३ धावा केल्या. त्याच्या खेळीने सामना एकतर्फी झाला. अश्विन व्यतिरिक्त शिवम सिंगने १६ धावांचे योगदान दिले. बाबा इंद्रजितने २९ चेंडूत २७ धावा केल्या.
या हंगामात आर. अश्विन चेंडू आणि बॅटने धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत त्याने ८ सामन्यांमध्ये ३४.३८ च्या सरासरीने आणि १६२.७२ च्या स्ट्राईक रेटने २७५ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत ३१ चौकार आणि १३ षटकार मारले आहेत. ८ सामन्यांमध्ये त्याने १२ बळी घेतले आहेत.