फोटो सौजन्य - एएनआय सोशल मिडिया
टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये रविद्र जडेजा आणि केएल राहुल यांनी शकते ठोकली आहेत. भारताचा पुढील सामना हा काही तासांमध्ये खेळवला जाणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये एकदिवसीय संघाचे कर्णधारपद हे शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा चॅम्पियन ट्राॅफीनंतर एकत्र पहायला मिळणार आहे. मालिकेतील दुसरा सामना १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. त्याआधी, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिल्लीतील त्यांच्या घरी संपूर्ण संघासाठी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. ८ ऑक्टोबरच्या रात्री, संपूर्ण भारतीय संघ प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या घरी डिनर पार्टीसाठी पोहोचला. टीम इंडिया बसने गंभीरच्या घरी पोहोचली.
संपूर्ण भारतीय संघ प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या घरी बसने पोहोचला असताना, हर्षित राणा त्यांच्या वैयक्तिक कारने डिनर पार्टीला पोहोचला. राणा वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाचा भाग नाही. तथापि, गंभीरने त्यांना डिनर पार्टीला आमंत्रित केले होते. त्यामुळे हर्षित टीम इंडियासोबत बसने प्रवास करू शकला नाही, ज्यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक कारने यावे लागले. हर्षित देखील दिल्लीचा रहिवासी आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड झाली आहे.
Harshit Rana went viral for arriving solo in a BMW at Gambhir’s team dinner while teammates took the bus—but the real reason is simple: as a local, he drove from home, not the hotel. Amid squad memes and selection debates, let’s not forget to support our cricket talent on and off… pic.twitter.com/FQRZeb04gd — Hook (@hookonline_) October 9, 2025
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणाऱ्या संघातील सर्व खेळाडू गौतम गंभीरच्या डिनर पार्टीला उपस्थित होते. कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार रवींद्र जडेजा, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिकल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णा हे देखील उपस्थित होते. कोचिंग स्टाफचे सर्व सदस्य देखील उपस्थित होते.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना एक डाव आणि १४० धावांनी जिंकला. या सामन्यात रवींद्र जडेजाने उत्कृष्ट कामगिरी करत त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळवून दिला. आता, टीम इंडिया दिल्ली कसोटी जिंकून वेस्ट इंडिजवर २-० अशी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.