फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2026 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या तयारीला सर्व संघ लागले आहेत. एकिकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई हे संघ ट्राय सिरीज खेळत आहेत, तर आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी आता ऑस्ट्रेलियाच्या संघाने घोषणा केली आहे. सध्या क्रिकेट सामने जोरात सुरू आहेत. बहुतेक संघ आशिया कप २०२५ पूर्वी द्विपक्षीय मालिका खेळण्यात व्यस्त आहेत. आता ऑस्ट्रेलियन संघ पुढील महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे ते ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२६ पूर्वी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.
या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. एकूण १४ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. संघाचे नेतृत्व मिचेल मार्श करतील. न्यूझीलंड दौऱ्यावरील या टी-२० मालिकेत ३५ वर्षीय स्टार खेळाडूचे पुनरागमन झाले आहे. हा खेळाडू गेल्या ९ महिन्यांपासून राष्ट्रीय संघाबाहेर होता, पण आता तो न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी आणि चेंडू दोन्हीने कहर करण्यास सज्ज आहे. १ ऑक्टोबरपासून टी-२० मालिका सुरू होणार आहे, ज्यामध्ये चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल.
सर्वप्रथम, कोण संघात आहे आणि कोण बाहेर आहे ते जाणून घेऊया. मार्कस स्टोइनिस व्यतिरिक्त, मिच ओवेन आणि मॅथ्यू शॉर्ट न्यूझीलंड दौऱ्यावर संघात परतले आहेत. गोलंदाज नॅथन एलिस, यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरी आणि अष्टपैलू आरोन हार्डी, कॅमेरॉन ग्रीन सारखे खेळाडू वगळण्यात आले आहेत. संघात परतलेल्या स्टोइनिसची अधिक चर्चा होत आहे, कारण तो टी-२० चा प्रचंड अनुभव घेऊन येतो आणि टी-२० विश्वचषकापूर्वी संघात परतल्याने ऑस्ट्रेलियाने या दिग्गज खेळाडूसह विश्वचषकात प्रवेश करण्याची योजना आखली आहे.
मार्कस स्टोइनिस हा एक अष्टपैलू खेळाडू आहे जो ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला बळकटी देत आहे. या खेळाडूमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीने संघाला सामने जिंकून देण्याची क्षमता आहे. त्याच्या संपूर्ण टी-२० कारकिर्दीत त्याने ३४० सामने खेळले आणि ६८०० हून अधिक धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने इतक्या सामन्यांमध्ये ३१० षटकार मारले आहेत. त्याने ऑस्ट्रेलियासाठी ७४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६३ षटकारांच्या मदतीने १२४५ धावा केल्या आहेत, तर त्याने चेंडूने एकूण १७९ बळी घेतले आहेत, त्यापैकी त्याने ऑस्ट्रेलियासाठी ५४ बळी घेतले आहेत.
Coming up soon: A quick trip across the Tasman for our Australian men’s team.
A 14-man squad has been named to face the @BLACKCAPS in three T20Is ✈️🇳🇿 pic.twitter.com/Kyl994OnG8
— Cricket Australia (@CricketAus) September 2, 2025
मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, टिम डेव्हिड, झेवियर बार्टलेट, बेन द्वारशुइस, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅट कुनहेमन, ग्लेन मॅक्सवेस. मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झांपा