फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये काही दिवसांमध्ये मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेमध्ये तीन टी20 सामने खेळवले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ या महिन्यात टी२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज जोश इंगलिस या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या वासराला दुखापत झाली आहे, ज्याची स्कॅनमधून पुष्टी झाली आहे, म्हणून त्याच्या जागी अॅलेक्स कॅरीची निवड करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद हे मिचेल मार्शकडे असणार आहे, तर न्यूझालंडचे कर्णधारपद हे मायकेल ब्रेसवेल हा संघाची कमान सांभाळणार आहे. गेल्या नऊ महिन्यांत दुसऱ्यांदा इंगलिस वासराच्या दुखापतीने त्रस्त आहे.नियमित कर्णधार मिशेल मार्श न्यूझीलंडविरुद्ध संघाचे नेतृत्व करेल. त्याच्या नेतृत्वाखाली शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट आणि बेन द्वारशीस सारख्या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. हे खेळाडू जलद गोलंदाजी विभागाची जबाबदारी सांभाळतील.
ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या संघात पाच स्टार अष्टपैलू खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये कर्णधार मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट आणि मार्कस स्टोइनिस यांचा समावेश आहे, ज्यांच्याकडे बॅट आणि बॉल दोन्हीने सामना फिरवण्याची क्षमता आहे. ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाला एका खेळाडूने दोन भूमिका बजावाव्यात असे वाटते, ज्यामुळे संघाची ताकद दुप्पट होईल.
मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, अॅलेक्स कॅरी, टिम डेव्हिड, बेन द्वारशिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मॅट कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झांपा, झेवियर बार्टलेट
Coming up soon: A quick trip across the Tasman for our Australian men’s team.
A 14-man squad has been named to face the @BLACKCAPS in three T20Is ✈️🇳🇿 pic.twitter.com/Kyl994OnG8
— Cricket Australia (@CricketAus) September 2, 2025
न्यूझीलंड ही मालिका घरच्या मैदानावर खेळेल. पहिला सामना १ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे, दुसरा सामना ३ तारखेला आणि तिसरा सामना ४ तारखेला होणार आहे. तिन्ही सामने माउंट मौंगानुई येथे होतील.