ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ या महिन्यात टी२० मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज जोश इंगलिस या मालिकेतून बाहेर पडला आहे.
अॅलेक्स कॅरी फलंदाजी करत असताना चोरटी धाव घेण्याचा त्याचा डाव अंगलट आला. श्रेयस अय्यरच्या सुसाट आलेल्या थ्रोने धाव बाद होऊन माघारी जावं लागलं. श्रेयसच्या फिल्डिंगच सर्वत्र कौतुक होत आहे.
ENG vs AUS Match : अत्यंत रोमांचकमोडमध्ये आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड सामन्याने क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. इंग्लडने 352 धावांचे लक्ष्य देऊनही ऑस्ट्रेलियाने सामना त्यांच्या हातातून हिसकावून घेतला.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करताना इंग्लडच्या वरच्या फळीतले फलंदाज लवकर बाद केले. अॅलेक्स कॅरीने आपल्या शानदार क्षेत्ररक्षणाची चुणूक पुन्हा एकदा दाखवत मिड-ऑनवर एक शानदार झेल घेतला.
आता ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने शनिवारी श्रीलंकेविरुद्ध इतिहास रचला. आता आशियामध्ये १५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी खेळणारा पहिला कांगारू यष्टीरक्षक बनला आहे.