Operation Sindoor: Indian spinner Varun Chakaravarthy's strong support for Operation Sindoor, Insta story goes viral..
Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’ हे आहे. भारतीय सशस्त्र दलांकडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत. विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री उशिरा जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला बहावलपूर आणि लष्कर-ए-तैयबाचा मुरीदके येथील तळासह नऊ दहशतवादी अड्ड्यांवर भारताकडून हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर, भारतीय स्टार फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे समर्थन केले आहे.
भारताच्या पाकिस्तानला दिलेल्या उत्तरानंतर भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने बुधवारी सकाळी इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्याने ऑपरेशन सिंदूर लिहून पोस्ट शेयर केली. वरुणने ही स्टोरी त्याच्या लष्करी शक्तीच्या शौर्यासाठी टाकली आहे. वरुण चक्रवर्ती यंदा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर दोन आठवड्यांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत लष्करी हल्ले करण्यात आले. संरक्षण मंत्रालयाकडून आज पहाटे १:४४ वाजता एक अधिकृत निवेदन जारी करण्यात आले. त्यावरून हल्ल्याची पुष्टी करण्यात आली आहे. मंत्रालया ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ही कारवाई अचूक, मोजमाप केलेली होती तसेच आणि चिथावणीखोर नव्हती. यामध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले नाही.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, जगाने दहशतवादाबाबत शून्य-सहिष्णुतेचा दृष्टिकोन स्वीकारला हवा. त्याने हा संदेश ‘X’ या सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही लष्करी कारवाई हवाई दल आणि लष्कराकडून संयुक्तपणे करण्यात आली.
काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आणि कम्युनिकेशन्सचे प्रभारी जयराम रमेश यांच्याकडून सांगण्यात आले की, ही एकता आणि एकतेची वेळ आहे. २२ एप्रिलच्या रात्रीपासून काँग्रेसने स्पष्ट केले आहे की सरकारला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादाचे सर्व स्रोत नष्ट करणे ही भारताची सर्वोच्च राष्ट्रीय प्राथमिकता असली पाहिजे.या असे ते म्हणाले.
आतापर्यंत या कारवाईत ९० ते १०० दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. मुर्डिकेमध्ये ३० दहशतवादी मारले गेले, तर इतर ठिकाणीही अनेक दहशतवादी मारण्यात आले आहेत.