
PAK vs NAM, T20 World Cup: Sahibzada hits a century in 58 balls, hitting fours and sixes! He did a great job in the T20 World Cup
Sahibzada Farhan’s record in the T20 World Cup : आयसीसी टी२० विश्वचषकातील ३५ वा सामना कोलंबो येथील सिंहली स्पोर्ट्स क्लब येथे सुरू आहे, या सामन्यात पाकिस्तान आणि नामीबिया आमनेसामने आले आहेत. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत साहिबजादा फरहानच्या शतकाच्या जोरावर ३ गडी गमावून १९९ धावा केल्या आणि नामिबिया संघासमोर २०० धावांचे टार्गेट दिले. या यादरम्यान, साहिबजादा फरहानने आयसीसी टी२० विश्वचषकात शतक ठोकत इतिहास रचला आहे.टी२० विश्वचषकात शतक करणारा पाकिस्तानचा दुसरा फलंदाज ठरला आहे.
साहिबजादा फरहानपूर्वी ही कामगिरी फक्त माजी क्रिकेटपटू अहमद शहजादच्या नावावर जमा होती, ज्याने २०१४ च्या टी२० विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध नाबाद १११ धावांची खेळी केली होती. शिवाय, नामिबियाविरुद्ध शतक ठोकून, फरहान चालू स्पर्धेत शतक ठोकणारा तिसरा फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी, कॅनडाचा युवराज समरा आणि श्रीलंकेचा स्टार पथुम निस्सांका यांनी शतक झळकवले होते. समराने न्यूझीलंडविरुद्ध ६५ चेंडूत ११० धावा केल्या, तर निस्सांकाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १०० धावांची खेळी केली होती.
हेही वाचा : RSA vs UAE, T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेचा युएईवर 6 गडी राखून विजय! दिमाखात सुपर 8 मध्ये एंट्री
आज नामिबियाविरुद्धच्या सामन्यात साहिबजादा फरहानच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर, त्याने पाकिस्तानकडून डावाची सुरुवात केली आणि एकूण ५८ चेंडूंचा सामना करत १७२.४१ च्या स्ट्राईक रेटने १०० धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत त्याने ११ चौकार आणि चार षटकार मारले. तो सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये नाबाद परतला.
पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानच्या नाबाद १०० धावांमुळे कोलंबोमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने २० षटकांत तीन गडी गमावून १९९ धावा उभ्या केल्या. फरहानशिवाय, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या कर्णधार सलमान आघाने देखील २३ चेंडूत ३८ धावांचे योगदान दिले. तर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या शादाब खानने २२ चेंडूत नाबाद ३६ धावा केल्या.
नामिबिया प्लेइंग इलेव्हन : लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन, गेर्हार्ड इरास्मस (कर्णधार), अलेक्झांडर वोल्शेंक, जेजे स्मित, झेन ग्रीन (कर्णधार), रुबेन ट्रम्पेलमन, विलेम मायबर्ग, बर्नार्ड स्कोल्झ, जॅक ब्रासेल
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान (कर्णधार), ख्वाजा नाफे, शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, सलमान मिर्झा, उस्मान तारिक