फोटो सौजन्य - सोशल मीडिया
नोमन अली हॅट्रिक : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मुलतानच्या मैदानावर खेळला जात आहे. शनिवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज नोमल अलीने पाच विकेट घेत वेस्ट इंडिजला हादरा दिला आहे. त्याने हॅटट्रिक घेत एक मोठा विक्रम रचला. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा नोमान पाकिस्तानचा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नोमानने ही कामगिरी केली आहे. त्याने सलग तीन चेंडूंवर ३ कॅरेबियन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
पहिल्या डावात वेस्ट इंडिज संघाची अवस्था अत्यंत वाईट असून वृत्त लिहिपर्यंत संघाने पहिल्या डावात ६० धावांचा टप्पा पार करताना ८ विकेट गमावल्या आहेत. नोमानने आतापर्यंत चार विकेट्स घेतल्या आहेत.
हॅट्ट्रिक घेऊन नोमानने एका महान क्लबमध्ये प्रवेश केला आहे. कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा तो पाकिस्तानचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. माजी अनुभवी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने पाकिस्तानसाठी पहिली कसोटी हॅटट्रिक घेतली. दोन कसोटी हॅट्ट्रिक घेणारा तो एकमेव पाकिस्तानी आहे. अब्दुल रज्जाक आणि मोहम्मद सामी यांचाही या यादीत समावेश आहे. विशेष म्हणजे वसीम, रज्जाक आणि सामी या तिन्ही माजी खेळाडूंनी श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली. नोमनच्या आधी वेगवान गोलंदाज नसीम शाहने पाकिस्तानसाठी हॅटट्रिक घेतली. २०२० मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत त्याने ही कामगिरी केली होती.
First a hat-trick, and now a fifer – his eighth in Test cricket! 🔥
Noman Ali continues to dominate 💪#PAKvWI | #RedBallRumble pic.twitter.com/Mx25RfhuWo
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 25, 2025
वसीम अक्रम विरुद्ध श्रीलंका (१९९९)
वसीम अक्रम विरुद्ध श्रीलंका (१९९९)
अब्दुल रज्जाक विरुद्ध श्रीलंका (२०००)
मोहम्मद सामी विरुद्ध श्रीलंका (२००२)
नसीम शाह विरुद्ध बांगलादेश (२०२०)
नोमान अली विरुद्ध वेस्ट इंडिज (२०२५)
दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाहुण्या वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली. नोमानने दुसऱ्याच षटकात कर्णधार क्रेग ब्रॅथवेटला (९) LBW बाद केले. यानंतर वेस्ट इंडिजच्या विकेट पडण्याची मालिका सुरू झाली. सलामीवीर मिकाईल लुईस (४), अमीर जांगू आणि अलिक अथानाजे यांचे खाते उघडले नाही. कावेम हॉजने (२१) काही काळ ताकद दाखवली पण त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. वेस्ट इंडिजच्या खराब स्थितीचा अंदाज यावरून लावता येतो की त्यांनी केवळ ५४ धावा जोडून ८ विकेट गमावल्या. सात खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.