Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS PAK : ‘हिरव्या झेंड्यासाठी…’, भारताकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवाने पाकिस्तानी चाहते खेळाडूंवर संतापले; पहा व्हिडिओ  

आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागल्याने पाकिस्तानी चाहत्यांचा चांगलाचा भडक उडाला आहे, त्यांनी आपल्याच संघाला सुनावले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 15, 2025 | 03:44 PM
IND VS PAK: 'For the green flag...', Pakistani fans get angry with the players after suffering an embarrassing defeat to India; Watch the video

IND VS PAK: 'For the green flag...', Pakistani fans get angry with the players after suffering an embarrassing defeat to India; Watch the video

Follow Us
Close
Follow Us:

Asia cup 2025 : आशिया कपमध्ये(Asia cup 2025) बहुचर्चित असलेला भारत-पाकिस्तान सामना काल पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागल्याने पाकिस्तानी चाहत्यांचा चांगलाच संताप झाल्याचे दिसून आले. रविवारी दुबईमध्ये झालेल्या सामन्यात भारतामे पाकिस्तानला एकतर्फी पराभूत केले. या पराभवासोबत पाकिस्तानी संघाच्या चाहत्यांनी आपल्याच संघाबद्दल भडका उडाला आहे.

या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते स्टेडियमबाहेर आणि सोशल मीडियावर पाकिस्तानी संघावर तोंडसुख घेताना दिसून येत आहेत. संघावर टीका करत आहेत. त्यांचे विविध प्रतिक्रिया असलेले व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.ज्यामध्ये ते संघाच्या कामगिरीला ‘निरुपयोगी’ आणि स्वतःला ‘अपमानित’ झाल्याचे म्हणत आहेत. हा पराभव फक्त एका सामन्याचा नसून तो वर्षानुवर्षे तुटलेल्या आशांची कहाणी सांगणारा आहे.

हेही वाचा : Ind vs Pak No Handshake : भारताच्या संघाने हॅन्डशेक न केल्यामुळे शोएब अख्तर संतापला, म्हणाला – याला राजकीय बनवू…

हिरवा झेंडा दाखवणाऱ्या खेळाडूंकडून आम्ही अपमानित

पाकिस्तानी चाहते संघाच्या रणनीतीवर आणि खेळाडूंच्या खेळण्याच्या क्षमतेवर भडकले आहेत. एका संतप्त चाहत्याने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “भारत हा जगातील सर्वोत्तम संघ असून आशिया कपमध्ये त्यांनी या मुलांसोबत खेळू नये. ही एक छोटी टीम आहे.” तर दुसरा चाहता नाराजी व्यक्त करत म्हटला की, “मी एक देखील सामना बघायचा राहत नाही. मी येथे अपमानित होण्यासाठी का येत असतो? मी येथे या हिरव्या झेंड्यासाठी येथे येत असतो. तुम्ही आम्हाला नेहमी अपमानित करता, या संघाला बंद करा.”

इंडिया को इन बच्चों के साथ खेलने ही नहीं चाहिए’-भारत से हार के बाद मायूस दिखे पाकिस्तान के फैन#IndVsPak #AsiaCup #IndiaVsPakistan #HindiNews #latestNews #Vipculture pic.twitter.com/ut4QE53M2d — Apka Aashish (@ApkaAashish) September 15, 2025

मन तुटलेले आता सामना पाहण्यासाठी…

भारत-पाकिस्तान सामन्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांची नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे. प्रचंड पैसे खर्च करून सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता म्हणतो की, “संपूर्ण सामना हा एकतर्फीच होता. अजिबात उत्साह दिसून आला नव्हता. जर सामना कुठेतरी टाईट झाला असता तर आम्ही तो चांगला सामना झाला असे म्हणू शकलो असतो. पण भारत खूप चांगला खेळला आहे.” अजून एका चाहत्याने म्हटले आहे की, ” माझे मन दुखावले. आम्ही आता पाकिस्तानचा कोणताही सामना पाहण्यासाठी येणार नाही.” तसेच एक चाहता म्हटला की,  “टीम इंडिया, कृपया पुढचा सामना खेळू नका. कृपया आमच्यावर बहिष्कार घाला. आम्ही स्वतःहून अंतिम फेरीत पोहोचू शकत नसल्याने कृपया आम्हाला मदत करा.”

Oman, UAE se hi jeetoge kya? 🤦‍♂️ Insaan ke bachhe bano!’ – Viral Pak Fan after Pakistan’s Loss 😂🔥 #INDvsPAK #AsiaCup2025 #SalmanAliAgha
Reports @lakshit1601 from Dubai pic.twitter.com/tt65m0xp1h
— Sports Yaari (@YaariSports) September 15, 2025

हेही वाचा : १० वर्षांची प्रतीक्षा संपली! सेंट्रल झोनने पटकावले दुलीप ट्रॉफीचे विजतेपद; दक्षिण झोनचा ६ विकेट्स उडवला धुव्वा

५ वर्षांपासून कुलदीप आम्हाला बरबाद करत आहे

या सामन्यात पाकिस्तानचा संघ कुठेही भारताविरुद्ध  लढताना दिसला नाही. यामुळे साहजिकच पाकिस्तानी खेळाडूंचा संताप होणे साहजिक आहे. प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण संघ फक्त १२७ धावाच करू शकला.कुलदीप यादवने शानदार कामगिरी करत त्याने ३ विकेट्स घेतल्या तर, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी २-२ विकेट्स घेत पाकिस्तानी संघाला चांगलेच अडचणीत आणले. प्रतिउत्तरात भारतीय संघाने १६ व्या षटकात सूर्यकुमार यादवच्या नाबाद ४७ धावांच्या जोरावर अगदी सहज साध्य केला.

Web Title: Pakistan fans furious after embarrassing defeat to india in asia cup 2025 watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK

संबंधित बातम्या

IND U19 vs PAK U19: “टॉसचा निर्णय बरोबर होता, पण…”; पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं!
1

IND U19 vs PAK U19: “टॉसचा निर्णय बरोबर होता, पण…”; पराभवानंतर आयुष म्हात्रेने नेमकं कुठे चुकलं ते सांगितलं!

IND U19 vs PAK U19: विकेट काय घेतली पाकिस्तानी गोलंदाज माजला! भारतीय कर्णधाराशी भर मैदानात घातला वाद; पाहा व्हिडिओ
2

IND U19 vs PAK U19: विकेट काय घेतली पाकिस्तानी गोलंदाज माजला! भारतीय कर्णधाराशी भर मैदानात घातला वाद; पाहा व्हिडिओ

IND U19 vs PAK U19 : पाकिस्तानने भारताचे स्वप्न धुळीस मिळवले; फायनलमध्ये टीम इंडियाचा मोठा पराभव
3

IND U19 vs PAK U19 : पाकिस्तानने भारताचे स्वप्न धुळीस मिळवले; फायनलमध्ये टीम इंडियाचा मोठा पराभव

U19 Asia Cup 2025 : टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या…! समीर मिन्हासने भारताविरुद्ध ठोकले शतक
4

U19 Asia Cup 2025 : टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या…! समीर मिन्हासने भारताविरुद्ध ठोकले शतक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.