मध्य झोनने दुलीफ ट्रॉफी २०२५ विजेतपड जिंकले(फोटो-सोशल फोटो)
बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळवण्यात आलेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सेंट्रल झोनने विजय मिळवला. दक्षिण झोनचा पहिला डावात फक्त १४९ धावांवर गदगडला होता. तर सेंट्रल झोनने शानदार फलंदाजी करत पहिल्या डावात ५११ धावांचा डोंगर उभा केला होता. पहिल्या डावाच्या आधारे सेंट्रल झोनकडून ३६२ धावांची आघाडी घेण्यात आली आहे. तथापि, दुसऱ्या डावामध्ये दक्षिण झोनच्या फलंदाजांनी शानदार पुनरागमन केले आणि ४२६ धावा केल्या. दुसरा डाव दक्षिण झोनने डावाचा पराभव टाळून मध्य झोनला ६५ धावांचे लक्ष्य दिले. जे सेंट्रल झोनने ३ विकेट गमावून सहज पूर्ण केले आणि सामना जिंकला.
सेंट्रल झोनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या डावात दक्षिण झोनचा संघ १४९ धावांवर गारद बाद झाला. दक्षिण झोनकडून तन्मय अग्रवालने सर्वाधिक ३१ धावा केल्या. इतर फलंदाज छाप पाडण्यास अपयशी ठरले. मध्य झोनकडून सरांश जैनने ५ विकेट तर कुमार कार्तिकेयने ४ विकेट घेतल्या होत्या. पहिल्या डावात सेंट्रळ झोनने ५११ धावा केल्या. सेंट्रल झोनकडून यश राठोडने सर्वाधिक १९४ धावा केल्या तर कर्णधार रजत पाटीदारने १०१ धावा करून योगदान दिले. दक्षिण विभागाकडून अंकित शर्मा आणि गुर्जपनीत सिंग यांनी प्रत्येकी ४ बळी घेतले.
दुसऱ्या डावात, दक्षिण विभागाने शानदार पुनरागामन करत ४२६ धावा केल्या. दक्षिण विभागाकडून अंकित शर्माने सर्वाधिक ९९ धावा तर आंद्रे सिद्धार्थने नाबाद ८४ धावांचे योगदान दिले. सेंट्रल झोनकडून कुमार कार्तिकेयने सर्वाधिक ४ बळी टिपले.
६५ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला सेंट्रल झोनने चार धावा गमावून ६५ धावांचे लक्ष्य सहज पूर्ण केले. सेंट्रल झोनकडून अक्षय वाडकरने सर्वाधिक नाबाद १९ धावा केल्या. दक्षिण विभागाकडून अंकित शर्माने २ आणि गुर्जपनीत सिंगने २ बळी टिपले.






