फोटो सौजन्य - सोशल मिडिया
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश : पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यामध्ये दोन कसोटी सामान्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या सामन्याचा विचार केला तर बांग्लादेशच्या संघाने एकतर्फी विजय मिळवून पाकिस्तानला धूळ चारली. पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये आज दुसऱ्या कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस (PAK vs BAN दुसरा कसोटी दिवस 1) पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे सर्वात जास्त नुकसान पाकिस्तान क्रिकेट संघाचे होणार आहे कारण त्यांनी पहिला सामना गमावला आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये रावळपिंडी येथे सामना आयोजित करण्यात आला होता. रावळपिंडीत मुसळधार पावसामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याचा नाणेफेकही होऊ शकली नाही. त्यामुळे पाकिस्तान संघाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे, कारण बांग्लादेशने पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रावळपिंडी येथे पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे खेळता आला नाही. रावळपिंडीत हवामान खूपच खराब होते. लंच ब्रेकपर्यंत हवामान स्वच्छ होण्याची प्रतीक्षा होती, मात्र सततच्या पावसामुळे सामना अधिकाऱ्यांनी पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
Bangladesh A Tour of Pakistan
3rd One-day | Pakistan Shaheens vs Bangladesh A | Match Called off due to rain.Pakistan Shaheens won the three-match One-Day series 1-0.#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh pic.twitter.com/kTLF9wV6Yo
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 30, 2024
पाकिस्तानचा संघ बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असून आता पुनरागमन करण्यासाठी फक्त चार दिवस उरले आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी आणि माजी पाकिस्तानी खेळाडूंनी संघाला सोशल मीडियावर खडसावले होते.