फोटो सौजन्य - Pakistan Cricket X सोशल मीडिया
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश सामन्यात खेळपट्टीचा अहवाल : पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडले आहेत. आज हे दोन्ही संघ त्यांचा शेवटचा लीग सामना खेळणार आहेत. दोन्ही संघांना टीम इंडियाकडून पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ आजचा चॅम्पियन ट्रॉफीचा शेवटचा सामना खेळणार आहेत. दोन्ही संघ आज शेवटच्या सामन्यांमध्ये विजयाने स्पर्धेचा शेवट करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता खेळला जाणार आहे.
या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर केले जाईल. याशिवाय, सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar वर असेल. जिथे तुम्ही हा सामना मोफत पाहू शकता. दोन्ही संघांना हा सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आपली मोहीम संपवायची आहे. या स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांना एकही सामना जिंकता आलेला नाही. पाकिस्तान संघ अवघ्या ६ दिवसांतच स्पर्धेतून बाहेर पडला, त्यामुळे यजमान संघावरही टीकेचा सामना करावा लागत आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश सामना रावळपिंडी मैदानावर खेळवला जाणार आहे. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही उपयुक्त ठरली आहे. आतापर्यंत येथे २७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. रावळपिंडी मैदानावर ज्या संघाने पहिले फलंदाजी केली आहे अशा संघाने १२ सामने जिंकले आणि तर पहिल्या गोलंदाजी करणाऱ्या संघाने १४ सामने जिंकले आहेत. येथील सर्वोच्च धावसंख्या ३३७/३ आहे, जी पाकिस्तानने २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध केली होती.
गुरुवारी होणाऱ्या पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. या दिवशी येथे पावसाची ७५% शक्यता आहे. आज रावळपिंडीचे वातावरण दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे आणि त्यामुळे उष्णता देखील राहणार नाही. दुपारी अधूनमधून पाऊस पडू शकतो. तापमान ११ ते १८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. आजच्या सामन्यांमध्ये दोन्ही संघाच्या खेळपट्टीवर क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे.
मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि विकेटकिपर), इमाम उल हक, सौद शकील, बाबर आझम, सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.
नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्जीद हसन, तौहिद हृदयॉय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, नाहिद राणा आणि मुस्तफिजूर रहमान.