फोटो सौजन्य - Sport360° सोशल मीडिया
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान : नुकतीच पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये T२० मालिका झाली. पाकिस्तान क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. टी२० मालिकेत, किवींनी मालिका ४-१ अशी जिंकली. आता लवकरच २९ मार्चपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेची पाळी आहे. या मालिकेत पाकिस्तानचे स्टार खेळाडू आपली प्रतिभा दाखवतील. पहिला सामना २९ मार्च रोजी नेपियरमध्ये खेळला जाणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाकिस्तान संघांची अत्यंत निराशाजनक कामगिरीमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
ज्येष्ठ खेळाडू बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि स्टार गोलंदाज नसीम शाह यांचे पुनरागमन झाले आहे. हे तिघेही टी-२० मालिकेत नव्हते. हे तेच स्टार खेळाडू आहेत जे न्यूझीलंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
New Zealand & Pakistan will be in ODI mode 🔜🏆#NZvPAK pic.twitter.com/brYLB1cvjJ
— Sport360° (@Sport360) March 28, 2025
पहिला सामना – २९ मार्च – नेपियर
दुसरा सामना – २ एप्रिल – हॅमिल्टन
तिसरा एकदिवसीय सामना – ५ एप्रिल – माउंट मौंगानुई
उजव्या हाताचा स्टार सलामीवीर बाबर आझमची अलीकडील कामगिरी चांगली नसली तरी न्यूझीलंडविरुद्धचा त्याचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. तो पाकिस्तानसाठी सर्वात मोठा सामना जिंकणारा खेळाडू बनू शकतो. किवींविरुद्ध, बाबरने २३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८.०४ च्या सरासरीने १००९ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. बाबरचा सर्वोच्च स्कोअर १०७ धावा आहे.
या मालिकेत मोहम्मद रिझवान कर्णधार असेल. त्याने न्यूझीलंडविरुद्ध १३ सामन्यांपैकी १२ डावात ४५.६६ च्या सरासरीने ४११ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ३ अर्धशतके झळकावली आहेत. कर्णधार आणि फलंदाज या दोन्ही भूमिकांमधील त्याची कामगिरी पाकिस्तानच्या विजयासाठी निर्णायक ठरेल. सर्व क्रिकेट चाहते रिझवानवर लक्ष ठेवून असतील.
या मालिकेत वेगवान गोलंदाज नसीम शाह गोलंदाजीची जबाबदारी सांभाळेल. त्याने न्यूझीलंडविरुद्ध ८ एकदिवसीय सामन्यात १७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी २४.१७ आणि इकॉनॉमी रेट ५.४८ आहे. कराची येथे या संघाविरुद्ध त्याने ५७ धावा देत ५ बळी घेतले आहेत. जर नसीम शाह त्याच्या फॉर्ममध्ये राहिला तर पाकिस्तान ही मालिकाही जिंकू शकतो.
मोहम्मद रिझवान (कर्णधार/विकेटकीपर), इमाम-उल-हक, बाबर आझम, अब्दुल्ला शफीक, सलमान अली आघा, तैयब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, इरफान खान, अबरार अहमद, मोहम्मद वसीम ज्युनियर, आकिफ जावेद, मोहम्मद अली, सुफियान मुकीम, हरिस रौफ, उस्मान खान, नसीम शाह.