PAK vs IND: Pakistan fears 'Yorker King' in Asia Cup 2025! Bumrah will have a big challenge to hit sixes..
Asia cup 2025 : ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ ला सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यूएईमध्ये दाखल झाला आहे. भारत १० सप्टेंबररोजी यूएईविरुद्ध पहिलला सामाना खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. यावेळी आशिया कप टी २० स्वरूपात खेळवण्यात येत आहे. भारत १४ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मध्ये आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत भिडणार आहे. या दोन संघात महामुकाबला होणार आहे. या सामन्यात पालकिस्तानला यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाने टी-२० मध्ये बुमराहविरुद्ध एक देखील षटकार मारलेला नाही. काय केले नाही? त्यामुळे या वेळी पुन्हा पाकिस्तानसाठी बूमराह डोकेदुखी असणार आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ३९१ चेंडू टाकले आहेत. या एकाही चेंडूवर पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला षटकार मारता आलेला नाही. यावेळी मात्र आशिया कपमध्ये पाकिस्तानचा प्रयत्न असेल तो म्हणजे बूमराहला षटकार ठोकणे. कारण आजवर पाकिस्तानी फलंदाज बूमराह समोर निष्प्रभ ठरलेले दिसतात.
यावेळी आशिया कप ही स्पर्धा टी-२० स्वरूपात खेळवण्यात येणार आहे, ज्यामध्ये दोन्ही संघ १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये आमनेसामने येणार आहेत. हा सामना फक्त पाकिस्तानी खेळाडूंसाठी एक सामना नसून यामध्ये बुमराहविरुद्ध षटकार मारण्याचे देखील आव्हान असणार आहे. आता हे पहावे लागणार आहे की, बुमराह पाकिस्तानी फलंदाजांना कसा जखडून ठेवतो.
हेही वाचा : अल्काराझच्या विजयाची गुरुकिल्ली कोणती? US Open 2025 चे विजेतेपद जिंकल्यानंतर प्रशिक्षकांनी केला खुलासा
भारतीय संघात जसप्रीत बुमराहच्या हजेरीमुळे आशिया कप जिंकण्याच्या शक्यतेत वाढ झाली आहे. कारण बुमराह प्लेइंग इलेव्हनमध्ये असताना भारतीय संघाने आशिया कपमध्ये एकही सामना गमावलेला नसून ही बाब भारतासाठी दिलसायक ठरणारी आहे. आतापर्यंत जसप्रीत बुमराहने खेळलेल्या १२ सामन्यांच्या इतिहासावरुन हा अंदाज काढता येतो.
पाकिस्तान, युएई आणि अफगाणिस्तान यांच्यात नुकतीच तिरंगी मालिका खेळवण्यात आली. या मालिकेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ७५ धावांनी पराभव केला. रविवार, ७ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन संघ अंतिम सामना खेळायला आमनेसामने आले होते. या दरम्यान पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजने हॅटट्रिक घेऊन इतिहास रचला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद नवाजने या सामन्यात त्याने ५ अफगाणी फलंदाजांना माघारी पाठवले. अफगाणिस्तानच्या फलंदाजीदरम्यान, नवाज पाकिस्तानसाठी सामन्यातील सहावा षटक टाकायला आला. या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूवर त्याने दोन बळी मिळवले. त्याने पाचव्या चेंडूवर दरवेश रसूलीला एलबीडब्ल्यू बाद केले तर त्याच वेळी, शेवटच्या चेंडूवर, अजमतुल्लाहला त्याने यष्टीरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडले.