मोहम्मद नवाज(फोटो-सोशल मीडिया)
Pakistan’s Mohammad Nawaz : पाकिस्तान, युएई आणि अफगाणिस्तान यांच्यात नुकतीच तिरंगी मालिका खेळवण्यात आली. या मालिकेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ७५ धावांनी पराभव केला. रविवार, ७ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन संघ अंतिम सामना खेळायला आमनेसामने आले होते. पाकिस्तान या सामन्यात वरचढ ठरला. पाकिस्तान संघाला आशिया कपपूर्वी संघासाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. या दरम्यान, पाकिस्तानच्या गोलंदाजांकडून टिच्चून मारा करण्यात आला. या दरम्यान पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजने हॅटट्रिक घेऊन इतिहास रचला आहे.
हेही वाचा : Happy Birthday Shubman Gill : भारतीय कसोटी कर्णधाराची मालमत्ता किती? जाणून घ्या पगार आणि कार कलेक्शन
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद नवाजने जेतेपदाच्या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत अफगाणिस्तानच्या फलंदाजांचे कंबरडेच मोडून टाकले. या सामन्यात त्याने ५ अफगाणी फलंदाजांना माघारी पाठवले. अफगाणिस्तानच्या फलंदाजीदरम्यान, नवाज पाकिस्तानसाठी सामन्यातील सहावा षटक टाकायला आला. या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूवर त्याने दोन बळी मिळवले. त्याने पाचव्या चेंडूवर दरवेश रसूलीला एलबीडब्ल्यू बाद केले तर त्याच वेळी, शेवटच्या चेंडूवर, अजमतुल्लाहला त्याने यष्टीरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडले.
मोहम्मद नवाजने घेतली ऐतिहासिक हॅटट्रिक
पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद नवाजने सामन्याच्या सहाव्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर लागोपाठ दोन बळी घेतले. त्यानंतर मोहम्मद नवाज सामन्यातील आठवे षटक टाकायला आला आणि या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने इब्राहिम झदरानला माघारी पाठवून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची पहिली हॅटट्रिक पूर्ण केली. यासह, नवाज पाकिस्तानसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी, कोणताही पाकिस्तानी फिरकी गोलंदाजाला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी कर्ता आलेली नाही.
पाकिस्तानकडून एकूण टी-२० मध्ये हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर आतापर्यंत एकूण तीन गोलंदाज असे करण्यात यशस्वी ठरले आहेत. मोहम्मद नवाज पाकिस्तानकडून टी-२० मध्ये हॅटट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी, फहीम अश्रफ आणि मोहम्मद हसनैन या दोन अन्य पाकिस्तानी गोलंदाजांकडून टी-२० क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेण्याची किमया साधण्यात आली आहे.
हेही वाचा : जो रूटने शतक ठोकून केला कहर! आता सचिनचा 100 शतकांचा विक्रम मोडण्यापासून फक्त इतक्या पावलांवर…
सामन्याची स्थिती काय?
पाकिस्तान, युएई आणि अफगाणिस्तान यांच्यात यांच्यात खेळवण्यात आलेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान समोरासमोर भिडले. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अफगाणिस्तानसमोर केवळ १४१ धावाच उभ्या करू शकला. पाकिस्तानकडून आगाने २४ आणि मोहम्मद नवाज यांनी २५ यांनी धावा केल्या. पाकिस्तानने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ १५.५ षटकांत केवळ सर्वबाद ६६ धावाच करू शकला. त्यानुसार, पाकिस्तानने हा सामना ७५ धावांनी आपल्या नावे केला.