फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच कसोटी मालिका संपन्न झाली. यामध्ये पाकिस्तानच्या संघाने पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्यामुळे सामना गमवावा लागला होता. त्यानंतर सलग दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून पाकिस्तानच्या संघाने इंग्लंडला पराभूत करून दमदार विजय मिळवला. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या आणि त्याच संख्येच्या T20I मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही मालिकेसाठी अद्याप कर्णधाराची निवड झालेली नाही. पाकिस्तानला ४ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यानंतर 14 नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे पीसीबीने संघ जाहीर केला असला तरी कर्णधार कोण होणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. पीसीबीने कर्णधाराशिवाय दोन्ही मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. पीसीबीने एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इमाद वसीम आणि मोहम्मद आमिर यांना एकदिवसीय मालिकेत किंवा टी-२० मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही.
हेदेखील वाचा – IND vs NZ : भारतीय महिला संघ लढतोय विश्वविजेत्या संघाशी! पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला केलं पराभूत
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान हा एकदिवसीय आणि टी-20 मध्ये पाकिस्तानचा पुढचा कर्णधार असेल. आणखी एक धक्कादायक अहवालही समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये एका पाकिस्तानी यूट्यूबरचा हवाला देत असे सांगण्यात आले आहे की, सलमान अली आगाने पीसीबी चेअरमनची भेट घेतली आहे आणि तोही पुढचा कर्णधार बनण्याच्या शर्यतीत सामील आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ २२ नोव्हेंबरपासून भारतासाठी लढणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाची एकदिवसीय मालिका आणि T२० मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध पाकिस्तानचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं मनोरंजक ठरेल. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर संघाचा विश्वास नक्कीच उंचावलेला आहे. इंग्लडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर संघामध्ये अनेक बदल करण्यात आले होते. यामधून पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला देखील बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला होता. परंतु आता त्याचे एकदिवसीय मालिकेत आणि T२० मालिकेत संघामध्ये पुनरागमन झाले आहे.
आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अराफत मिन्हास, बाबर आझम, फैसल अक्रम, हरिस रौफ, हसीबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह , सॅम अयुब, सलमान अली आगा आणि शाहीन शाह आफ्रिदी.
अराफत मिन्हास, बाबर आझम, हारिस रौफ, हसिबुल्लाह, जहाँदाद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, ओमेर बिन युसूफ, साहिबजादा फरहान, सलमान अली , शाहीन शाह आफ्रिदी, सुफयान मोकीम आणि उस्मान खान.