फोटो सौजन्य - Pakistan Cricket सोशल मीडिया
मोहम्मद रिझवान : पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रवास चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ने संपला आहे. न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानला ६० धावांनी पराभूत केले तर भारताच्या संघाने पाकिस्तानला ४५ चेंडू शिल्लक असताना ६ विकेट्सने पराभूत केले, तर बांगलादेशविरुद्ध खेळला जाणारा शेवटचा सामना पावसामुळे वाया गेला. २९ वर्षांनंतर आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन केले होते त्याचबरोबर पाकिस्तानने याआधी झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद देखील नावावर केले होते, पण यंदाची यजमान संघाची पाकिस्तानची कामगिरी अत्यंत लज्जास्पद होती. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला होता.
या खराब कामगिरीनंतर, मोहम्मद रिझवान आणि मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दोघांवरही बरीच टीका होत आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज इमाम उल हकने रिझवानबद्दल अशी टिप्पणी केली की ती जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटले. मोहम्मद रिझवानबाबत इमाम उल हकने धक्कादायक विधान केले आहे सध्या हे त्याचे विधान सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
खरंतर, पाकिस्तान संघाचा सलामीवीर फलंदाज इमाम उल हकने मोहम्मद रिझवानबद्दल एका व्हिडिओमध्ये सांगितले की, तो संपूर्ण संघाला नमाजसाठी कसे एकत्र करतो आणि गैर-मुस्लिम लोक त्यात सहभागी होऊ नयेत हे देखील लक्षात ठेवतो. आम्ही तुम्हाला सांगतो की पाकिस्तान संघ २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर संघाचा स्पर्धेतला प्रवास संपला. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये इमामने कॅप्टन रिझवानबद्दल असे काही खुलासे केले आहेत, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. इमामने एका पॉडकास्टमध्ये सांगितले होते की रिजवान खूप धार्मिक आहे आणि तो संघालाही तोच मार्ग अवलंबण्यास सांगतो.
Imam Ul Haq speaks on Leadership of Mohd Rizwan.. pic.twitter.com/xOX5BM9pOn
— RVCJ Media (@RVCJ_FB) February 27, 2025
इमामने अल्ट्रा एज पॉडकास्टवर कर्णधाराच्या सवयींबद्दल संघातील लीडर कोण आहे याचे उत्तर दिले. तो सर्वात आधी म्हणाला, मी कोणाचे नाव नेते म्हणून घ्यावे का? (हसू लागला) सगळे आपापसात भांडत आहेत. नंतर इमामने रिझवानकडे बोट दाखवत सांगितले की रिझवान नमाजसाठी हॉटेलच्या खोल्या व्यवस्थित करतो. सर्वांना नमाजसाठी एकत्र करतो. नमाजसाठी पांढरी चादर पसरवतो. बिगर मुस्लिमांना खोलीत प्रवेश देऊ देत नाही आणि नमाजसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप देखील तयार करतो. पाकिस्तानच्या संघाने मागील काही महिन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संघावर टीकेचा सामना करावा लागत आहे.