फोटो सौजन्य - ANI X अकाउंट
मनु भाकरची बक्षीस रक्कम : भारताची स्टार शुटर मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक मिळवून इतिहास घडवला. त्यानंतर तिचे देशानेच नाही तर जगभरामध्ये कौतुक केले जात आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने ६ पदकांची कमाई केली. यामध्ये पाच कास्यपदकांचा समावेश आहे तर एक सिल्वर मेडल खात्यात जमा झाले आहे. मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली. त्यानंतर तिने आणि सरबजोत सिंह याने १० मीटर एअर पिस्तूल मिक्स टीममध्ये कांस्यपदक सामन्यांमध्ये त्या दोघांनी कोरिया जोडीला पराभूत करून मेडल नावावर केले. त्यानंतर ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.
हेदेखील वाचा – प्रो कबड्डी लीगमध्ये पाच वर्षानंतर JANG KUN LEE चे पुनरागमन! दक्षिण कोरियाचा सर्वात यशस्वी खेळाडू
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये २ कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनू भाकर यांच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव थांबत नाही. आता क्रीडा आणि युवा व्यवहार राज्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी त्यांचा पुष्पगुच्छ आणि १० लाखांचा धनादेश देऊन गौरव केला आहे. हा कार्यक्रम दिल्लीत पार पडला, जिथे सर्बानंद सोनोवाल यांनी मनू भाकरची आई सुमेधा भाकर आणि वडील राम किशन भाकर यांचा शाल देऊन सन्मान केला.
#WATCH | Union Minister Sarbananda Sonowal felicitates Paris Olympics 2024 double medal winner, shooter Manu Bhaker in Delhi and presents her with a cheque of Rs 10 Lakhs pic.twitter.com/cDLjY0pHTG
— ANI (@ANI) August 16, 2024
मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन कांस्यपदक मिळवले आहेत, त्यानंतर तिचा देशामध्ये गौरव केला जात आहे. मनू भाकर हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातून आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल हरियाणा सरकारने त्याला आधीच ५ कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. याशिवाय केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी त्यांना ३० लाख रुपयांची वेगळी रक्कम देण्याची घोषणा केली होती.