फोटो सौजन्य - ProKabaddi फेसबुक
प्रो कबड्डी लीग २०२४ ची लवकरच सुरुवात होणार आहे. या नव्या सीझनमध्ये अनेक युवा खेळाडू लीगमध्ये पदार्पण करतील. त्याचबरोबर अनेक विदेशी खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतात. सध्या प्रो कबड्डी लीग २०२४ च्या नव्या पर्वाची ऑक्शन सुरु आहे. हे ऑक्शन दोन दिवस आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या दिवशी खेळाडूंवर ८ कोटींची बोली लावण्यात आली. ऑक्शनच्या पहिल्याच दिवशी ८ खेळाडूं कोट्यवधी झाले. आता दुसऱ्या दिवशी कोणत्या खेळाडूंवर किती बोली लागेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पहिल्याच दिवशी सचिन तणवर हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला तमिळ थलाईवाजने २.१५ कोटी रुपयांना विकत घेतले.
आज सर्वांचे लक्ष्य हे जंग कुन लीवर असणार आहे. २०१९ नंतर दक्षिण कोरियाचा जंग कुन ली आता प्रो कबड्डी लीगमध्ये पुनरागमन करणार आहे. जंग कुन लीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यत ९१० रेड केल्या आहेत यामध्ये त्याने ४३३ पॉईंट घेतले आहेत. यामध्ये त्याने १४ सुपर रेड आणि ९ सुपर टेन केले आहेत. जंग कुन ली हा दक्षिण कोरियाचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. २०१९ नंतरच्या पुनरागमनानंतर जंग कुन ली पटना पायरेट्समधून खेळताना दिसणार आहे.
ऑक्शनच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी सचिन तनवरने सर्वाधिक २.१५ कोटींची किंमत घेतली आणि तो तमिळ थलायव्हाजकडून खेळणार आहे. इराणचा मोहम्मद्रेझा चियानेह ( २.०७ कोटी), गुमान सिंग ( १.९७ कोटी), पवन सेहरावत ( १.७२५ कोटी) आणि भरत ( १.३० कोटी) हे महागडे खेळाडू ठरले. चढाईपटूंमध्ये मनिंदर सिंग ( १.१५ कोटी), अजिंक्य पवार ( १.१०७ कोटी) व मनजीत ( ८० लाख) यांनीही मोठी रक्कम घेतली.