फोटो सौजन्य : Delhi Capitals/Punjab Kings
पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कपिटल्स टाॅस अपडेट : सवाई मानसिंह स्टेडीयमवर आज पंजाब किंग्सचा सामना आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. हा सामना याआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाढलेल्या तणावाच्या वातावरणामुळे रद्द करण्यात आला होता. आज हा सामना पुन्हा खेळवला जात आहे. आजच्या सामन्याच दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात अक्षर पटेल हा सामना खेळणार नाही, तो आजारामुळे मागील सामन्यात देखील अनुपस्थित होता. आजचा सामना पंजाब किंग्सच्या संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे.
आजच्या सामन्यामध्ये अभिषेक पोरेल याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संघात स्थान मिळाले नाही. त्याच्या जागेवर आज करून नायर याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर अक्षर पटेलच्या जागेवर आज सदिकुल्लाह अतल याला संघामध्ये आज स्थान मिळाले आहे. मोहित शर्मा आणि मुकेश कुमार या दोघांनाही पुन्हा संघामध्ये प्लेईंग इलेव्हनचा हिस्सा बनवण्यात आले आहे. तर केल राहुल हा पुन्हा एकदा या सामन्यांमध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघामध्ये सामील होईल.
पंजाब किंग्सच्या संघाबद्दल सांगायचे झाले तर आजच्या सामन्यात मार्कस स्टॉयनिस आणि जोश इंग्लिश या दोघांनाही आज पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. युझवेंद्र चहल आज संघामध्ये स्थान मिळाले नाही, आज त्याची तब्येत खराब असल्यामुळे येतो आजचा सामना खेळणार नाही.
🚨 Toss 🚨@DelhiCapitals won the toss and elected to field against @PunjabKingsIPL
Updates ▶️ https://t.co/k6WP8zBwzL #TATAIPL | #PBKSvDC pic.twitter.com/1q3Ln2C5Vv
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2025
या सीजनमध्ये पंजाब किंग्सची सलामीवीर जोडी प्रभसिमरण सिंह आणि प्रियांश आर्या या दोघांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली आहे त्यामुळे आजच्या सामन्यात हे दोघे कसे कामगिरी करतील हे पाहणे मनोरंजक ठरेल. के एल राहुलने मागील सामन्यांमध्ये शतक झळकावले होते पण मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात तो विशेष कामगिरी करू शकला नाही तो आजच्या शेवटच्या दिल्ली कॅपिटलचे सामन्यात कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
फाफ डुप्लेसी (कर्णधार), करून नायर, सदिकुल्लाह अतल, समीर रिजवी, ट्रिस्टन स्टॅब्स, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुस्तफिझुर रहमान, मुकेश कुमार
श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, जोश इंग्लिश, नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सन, अजमतुल्लाई उमरजाई, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंह