फोटो सौजन्य - X
आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली, त्याचबरोबर नवीन कर्णधाराची देखील घोषणा केली. भारताचा संघ आता रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर 20 जूनपासून जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी भारताच्या संघाला कसोटीमध्ये चांगली रँकिंग त्याचबरोबर चांगली कामगिरी करणे फार गरजेचे आहे. भारताचा संघ 2025 ते 2017 पर्यंत कोणकोणत्या संघांसोबत कसोटी क्रिकेट खेळणार आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
इंग्लंड विरुद्ध भारताचा संघ जून ते ऑगस्ट या दोन महिने पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तर त्यानंतर भारताचा संघ हा ऑक्टोबर 2025 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यावेळी वेस्ट इंडिजचा संघ भारतीय दौऱ्यावर असणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये भारताचा संघ हा त्यांच्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिका खेळणार आहे. डिसेंबर 2025 म्हणजे वर्षाच्या शेवटी भारताचा संघ दोन कसोटी मालिका खेळणार आहे ही मालिका डिसेंबरमध्ये साऊथ आफ्रिकाविरुद्ध खेळवली जाणार आहेत. त्यानंतर भारताचा संघ 2025 नंतर डायरेक्ट 2026 मध्ये ऑगस्ट महिन्यात श्रीलंका विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
THE TOUGHEST WTC CYCLE OF TEAM INDIA…!!!! 🏆 pic.twitter.com/ga0CwCxoIP — Johns. (@CricCrazyJohns) May 24, 2025
श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये भारताचा संघ श्रीलंका दौरा करणार आहे. त्यानंतर भारताचा संघ ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये 2026 मध्ये न्युझीलँड विरुद्ध दोन सामन्यांची मालिका खेळणार आहे यावेळी संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असणार आहे. त्यानंतर या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप च्या सायकलच्या शेवटचा मालिका ही भारताचा संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका आयोजित करण्यात आली आहे. ही मालिका जानेवारी २०२७ फेब्रुवारी २०२७ या काळामध्ये खेळवली जाणार आहे.
तारीख | संघ | सामने | स्थान |
---|---|---|---|
जून – ऑगस्ट 2025 | भारत विरुद्ध इंग्लड | पाच कसोटी सामने | परदेश दौरा |
ऑक्टोंबर 2025 | भारत विरुद्ध वेस्ट इंडीज | दोन कसोटी सामने | होम ग्राउंड |
डिसेंबर 2025 | भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका | दोन कसोटी सामने | होम ग्राउंड |
ऑगस्ट 2026 | भारत विरुद्ध श्रीलंका | दोन कसोटी सामने | परदेश दौरा |
ऑक्टोंबर – डिसेंबर 2026 | भारत विरुद्ध न्यूझीलंड | दोन कसोटी सामने | परदेश दौरा |
जानेवारी – फेब्रुवारी | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | पाच कसोटी सामने | होम ग्राउंड |