Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS vs MI : पंजाब किंग्जची अंतिम फेरीत धडक अन् Preity Zinta ने आनंदाने मारल्या उड्या, पहा VIDEO

आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला. यावेळी पंजाबने अंतिम फेरीत प्रवेश करताच फ्रँचायझीची सह-मालक प्रीती आनंदाने तिच्या जागेवर उड्या मारताना दिसली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 02, 2025 | 03:54 PM
PBKS vs MI: Punjab Kings storm into the final and Preity Zinta jumps with joy, watch VIDEO

PBKS vs MI: Punjab Kings storm into the final and Preity Zinta jumps with joy, watch VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

PBKS vs MI : आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामना काल पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला. या विजयासह पंजाबने अंतिम फेरीत धडक मारली. मुंबई इंडियन्सने पंजाबसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना, पंजाब किंग्जकडून श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ८७ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर २०४चे लक्ष्य १९ व्या षटकात सहज पूर्ण केले.  श्रेयस अय्यरने षटकार खेचून सामना जिंकवला. पंजाब किंग्जने मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयाने फ्रँचायझीची सह-मालक प्रीती आनंदाने तिच्या जागेवर उड्या  मारताना दिसून आली.

पंजाब किंग्ज संघाने २०१४ नंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. श्रेयस अय्यरने विजयी षटकार मारताच, प्रीती झिंटा आनंदाने तिच्या जागेवर उड्या मारायला सुरवात केली. संघ अंतिम फेरीत पोहोचल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. अशी आनंदाचीसंधी प्रीती झिंटाच्या आयुष्यात १० वर्षांनी आली. झिंटाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आयपीएल ऑन एक्सने शेअर केला आहे. त्यानंतर तिची प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल होऊ लागली.

हेही वाचा : ENG vs WI : Joe Root एक्सप्रेस सुसाट! इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास…

अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयासह, अय्यरने एक खास कामगिरी केली आहे. तो तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएलच्या अंतिम फेरीत नेणारा जगातील पहिला कर्णधार बनला आणि दोन वेगवेगळ्या संघांसह सलग आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला कर्णधार देखील बनला आहे. अय्यरने नेहल वधेरा (४८ धावा) सोबत चौथ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली.  तर मार्कस स्टोइनिस (२ धावा) सोबत सहाव्या विकेटसाठी नाबाद ३८ धावा जोडल्या. यासोबत २०१४ च्या आयपीएलच्या अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाचा संस्मरणीय विजय झाला.

A DO𝗠𝗜NATING WIN! ❤️

Sarpanch @ShreyasIyer15 fires #PBKS into the #IPLFinal with an astonishing finish! 👏🏻🙌🏻

Watch #IPLFinals 👉 #RCBvPBKS | TUE, 3rd June, 5 PM on Star Sports Network & JioHotstar#ShreyasIyer pic.twitter.com/NKXXpkG2S8

— Star Sports (@StarSportsIndia) June 1, 2025

आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या नॉकआउट सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धचा विजय हा आयपीएलमध्ये अय्यरचा कर्णधार म्हणून ५० वा विजय ठरला आहे. कर्णधार म्हणून अय्यरपेक्षा फक्त एमएस धोनी, रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि विराट कोहली यांनीच आयपीएलचे सामने जिंकले आहेत.

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय

  1. एमएस धोनी (सीएसके/आरपीएसजी) – १३६
  2. रोहित शर्मा (एमआय) – ८७
  3. गौतम गंभीर (डीसी/केकेआर) – ७१
  4. विराट कोहली (आरसीबी) – ६६
  5. श्रेयस अय्यर (पीबीकेएस) – ५०*

हेही वाचा : कोण होणार BCCI चे नवे अध्यक्ष? रॉजर बिन्नी निवृत्त होणार

आयपीएल २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे.  हा सामना अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या हंगामात आयपीएलला एक नवीन विजेता मिळणार आहे. पीबीकेएस आणि आरसीबी दोघांनीही २००८ मध्ये लीग सुरू झाल्यापासून प्रत्येक आयपीएल हंगामात भाग घेतला असून त्यांना अद्याप एकदाही विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही.

Web Title: Pbks vs mi punjab kings storm into the final and preity zinta jumps with joy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 03:54 PM

Topics:  

  • IPL 2025
  • PBKS vs MI
  • Preity Zinta
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
1

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
2

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
3

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
4

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.