फोटो सौजन्य : X
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सामना पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात २० जून पासुन होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व हा रोहित शर्माच्या निवृतीनंतर शुभमन गिल हा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना भारतीय संघामध्ये स्थान मिळाले आहे. आता भारतीय नियामक मंडळाच्या आता महत्वाची चर्चा सुरु झाली आहे. भारत विरुद्ध इंग्लड या मालिकेदरम्यान बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी निवृत्त होतील. अशा परिस्थितीत मंडळाला नवीन अध्यक्ष मिळणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष असणार आहेत. बिन्नी यांनी २०२२ मध्ये बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. पण आता ते २०२५ मध्ये निवृत्त होण्यास तयार आहेत. रॉजर १९ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. अशा परिस्थितीत, बोर्डाला त्यांच्या जागी नवीन अध्यक्ष मिळणार आहे. जर वृत्तांवर विश्वास ठेवला तर, राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष असतील. त्यांना हंगामी अध्यक्ष बनवता येईल.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले आहे की, “१९ जुलै रोजी रॉजर बिन्नी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीव शुक्ला यांना बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष बनवले जाऊ शकते. या वर्षाच्या अखेरीस सप्टेंबर महिन्यात नवीन बीसीसीआय अध्यक्ष निवडले जातील.”
राजीव शुक्ला हे बऱ्याच काळापासून बीसीसीआयशी जोडलेले आहेत. त्यांना अनेक महत्त्वाच्या पदांवरही नियुक्त करण्यात आले आहे. सध्या ते बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाची भूमिका बजावत आहेत. आता असे दिसते की राजीव शुक्लांची जबाबदारी वाढणार आहे. याशिवाय राजीव शुक्ला हे इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्षही राहिले आहेत. सध्या ते सौरव गांगुलीच्या काळापासून बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत.
रॉजर बिन्नीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी पहिल्यांदाच बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यापूर्वी त्यांनी २०१९ ते २०२२ पर्यंत कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. रॉजर निवृत्त झाल्यावर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून खेळला जाईल, तर शेवटचा सामना १० जुलैपासून खेळला जाणार आहे.