PBKS vs RCB Final Match: Royal Challengers Bangalore set Punjab Kings a target of 191 runs; Iyer Sena one step away from IPL title
PBKS vs RCB Final Match : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा अंतिम महामुकाबला आज म्हणजे ३ जून रोजी खेळवण्यात येत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जेतेपदाचा सामना सुरू आहे. सामन्यापूर्वी पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत १९० धावा उभारल्या आहेत. आता फायनल जिंकण्यासाठी पंजाबला १९१ धावा कराव्या लागणार आहे. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा केल्या आहेत. तर पंजाबकडून काइल जेमिसने आणि अर्शदीप सिंहने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या आहेत.
आरसीबीची सुरवात चांगली झाली नाही. ला संघाला दुसऱ्याच षटकात काइल जेमिसने झटका दिला. बसला आहे. पंजाबच्या काइल जेमिसनने फील सॉल्टला झेलबाद करून माघारी पाठवले. आरसीबीला दुसरा झटका बसला आहे. मयंक अग्रवाल १८ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. त्याला युजवेंद्र चहलने माघारी पाठवले. आरसीबीला धक्क्यावर धक्के बसत गेले. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला १६ चेंडूत २६ धावाच करता आल्या. त्याला काइल जेमिसनने पव्हेलियनमध्ये माघारी पाठवले.
हेही वाचा : IPL 2025 RCB vs PBKS Final: “… स्पर्धेची पुनरावृत्ती होणार”; श्रेयस अय्यरने फायनलआधी रजत पाटीदारला डिवचलं
आरसीबीचा सलामीवीर विराट कोहलीने जम बसवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला अजमतुल्ला उमरजाईने आपला बळी बनवले. विराटने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या. लियाम लिविंस्टनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु तो देखील खास करू शकला नाही.तो १५ चेंडूत २५ धावा करून काइल जेमिसनचा शिकार ठरला. फलंदाजीसाठी आलेला जितेश शर्माने जलद १० चेंडूत २४ धावा करून आरसीबीची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा रथ विशक विजय कुमारने रोखला. रोमरियो शेफर्डने थोडा प्रतिकार केला परंतु त्याला अर्शदीप सिंहने माघारी पाठवले. पंजाबकडून काइल जेमिसने( ४ ओव्हरमध्ये ४८ धावा) आणि अर्शदीप सिंहने (४ ओव्हर ४० धावा ) यांनी प्रत्येकी ३ विकेट्स मिळवल्या. युजवेंद्र चहल, विशक विजय आणि अजमतुल्ला उमरजाई यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
विराट कोहली, फिल्ल साॅल्ट, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंस्टन, जितेश शर्मा, रोमरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवुड, सुयश शर्मा
प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, जोस इंग्लिॉश, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टायनिस, अजमतुल्ला उमरजाई, विशक विजय कुमार, काइल जेमिसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह