आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय सैन्याचा सन्मान(फोटो-सोशल मिडिया)
RCB vs PBKS Final Match : आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आज म्हणजे ३ जून रोजी खेळवला जात आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हा सामना खेळवण्यात येत आहे. सामन्यापूर्वी पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ फलंदाजी करत आहे. आरसीबी हा सामना जिंकून १८ वर्षांचा दुष्काळ संपवू इच्छिते. त्याच वेळी, पंजाब किंग्ज त्यांच्या नवीन कर्णधारासह नवीन इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर आहे. आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय सैन्याला सन्मानित करण्यात आले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली, आरसीबी चालू हंगामात उत्तम शैलीत क्रिकेट खेळताना दिसत आहे. आजच्या जेतेपदाच्या सामन्यात देखील त्याच अपेक्षा चाहत्यांनी लावून धरली आहे. यावेळी आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय सैन्याला सन्मानित केले आहे.
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआयकडून भारतीय सैन्याला सन्मानित करण्यात आले आहे. या दरम्यान बी. पारक आणि सुखविंदर सिंग यांचे देशभक्तीपर गीत वाजवण्यात आले. तसेच त्यानंतर शंकर महादेवन यांनी लाईव्ह सादरीकरण करून देशभक्तीपर गीते गायली. दरम्यान संपूर्ण स्टेडियम देशभक्तीत बुडालेले दिसून आले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लाखो चाहत्यांनी देशभक्तीपर गीतांचा आनंद लुटला. हा कार्यक्रम सुमारे अर्धा तास सुरू होता.
Lighting up the #Final with an enthusiastic Tribute Ceremony 🇮🇳#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile pic.twitter.com/b0WptvNnIO
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज शानदार कामगिरी करत आला आहे. नवीन कर्णधारासह संघाचे नशीब देखील बदलेले आहे. श्रेयस अय्यरने पंजाब किंग्जसाठी ६०३ धावा काढण्यासोबतच शानदार कर्णधारपदाची जबाबदारी देखील सांभाळत आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध क्वालिफायर-२ मध्ये स्फोटक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आणि संघाला अंतिम सामन्यात पोहचवले. पंजाब किंग्ज ११ वर्षांनी आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळत आहे. अशा परिस्थितीत, पंजाब कोणत्याही परिस्थित अंतिम ट्रॉफी जिंकायचा प्रयत्न करणार आहे.
विराट कोहली, फिल्ल साॅल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंस्टन, जितेश शर्मा, रोमरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवुड, सुयश शर्मा
प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, जोस इंग्लिॉश, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टायनिस, अजमतुल्ला उमरजाई, विशक विजय कुमार, काइल जेमिसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह