
Once upon a time, there was an accusation of rape! Now the suspension on 'that' player is lifted; PCB takes a big decision
Haider Ali’s suspension lifted : पाकिस्तान क्रिकेट संघांमधील अनेक खेळाडू २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश प्रीमियर लीग (बीपीएल) २०२५ मध्ये खेळताना दिसणार आहेत. या दरम्यान, पाकिस्तानी खेळाडू हैदर अली ज्याच्यावर इंग्लंडमध्ये बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे तो काही महिन्यांपासून चांगलाच वादात अडकला आहे. सप्टेंबरमध्ये इंग्लंड दौऱ्यादरम्यान हैदर अलीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) त्याला बंदी घातली आणि तो बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला आहे.
हेही वाचा : AUS vs ENG : उस्मान ख्वाजा तिसऱ्या अॅशेस कसोटीत खेळेल की पाच दिवस बेंचवर? मायकेल क्लार्कचा मोठा दावा
पीसीबीकडून आता हैदर अलीला बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देण्यात आले आहे. या निर्णयामुळे हैदर अली व्यावसायिक क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे.
बलात्काराच्या आरोपानंतर पीसीबीकडून हैदर अलीला इंग्लंड दौऱ्यादरम्यान खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणात, पाकिस्तानी महिला तक्रारदाराकडून मँचेस्टर सिटी पोलिसांकडे बलात्काराचा अहवाल दाखल करण्यात आला केला. चौकशीनंतर हैदर अली पूर्णपणे निर्दोष आढळून आला. त्यानंतर पीसीबीने बंदी उठवली आणि त्याला बीपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देखील दिली आहे. पीसीबीकडून दुजोरा देण्यात आला आहे की, हैदर अली आता पूर्णपणे तंदुरुस्त असून आणि मैदानावर खेळण्यास सज्ज आहे.
हैदर अलीने आतापर्यंत पाकिस्तानसाठी ३५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने आणि दोन एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. तो सध्या पाकिस्तानच्या मुख्य संघाचा भाग नाही, परंतु बीपीएलमध्ये खेळल्याने त्याचा फॉर्म आणि अनुभव वाढण्यात मदत होणार आहे.
बीपीएल २०२५ मध्ये खेळाडूंचा सहभाग २०२६ च्या टी२० विश्वचषकापूर्वी महत्त्वाचा ठरणार आहे. पाकिस्तान संघ पुढील वर्षी तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी प्रमुख खेळाडूंची उपलब्धता सध्या अनिश्चित मानली जात आहे. पीसीबीच्या या निर्णयामुळे हैदर अली आणि इतर खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांची क्षमता दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.