फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा पुरुषांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आशिया कप विश्वचषकाआधी खेळणार आहे. आयुष म्हात्रे हा आशिया कपमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. वैभव सुर्यवंशी देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे. १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे होणाऱ्या पुरुषांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या १५ सदस्यीय संघात आर्यन शर्मा आणि जॉन जेम्स या दोन भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
आर्यन हा एक उपयुक्त फलंदाज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज आहे, तर जेम्स हा एक अष्टपैलू खेळाडू आहे जो उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. सप्टेंबरमध्ये भारताविरुद्धच्या युवा कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत हे दोघेही सहभागी होते. भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूंव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाच्या संघात श्रीलंकेचे दोन वंशाचे खेळाडू (नादेन कुरे आणि नितेश सॅम्युअल) आणि चिनी वंशाचा एक खेळाडू (अॅलेक्स ली यंग) यांचाही समावेश आहे. ऑलिव्हर पीक हा संघाचा कर्णधार आहे.
“आयसीसी अंडर-१९ विश्वचषकासाठी एक मजबूत आणि संतुलित संघ जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे,” असे ऑस्ट्रेलियाच्या ज्युनियर संघाचे मुख्य प्रशिक्षक टिम निल्सन म्हणाले. “आमचे लक्ष अशा खेळाडूंची निवड करण्यावर आहे ज्यांचे कौशल्य एकमेकांना पूरक आहे आणि ज्यांच्याकडून आम्ही स्पर्धेत यशाची अपेक्षा करू शकतो.”
Australia name their #U19WorldCup squad as they aim to emulate their nation’s 2024 success 🏆 All squads named thus far 📲 https://t.co/x8Ic4c5Vue pic.twitter.com/UAfojlNqWg — ICC (@ICC) December 11, 2025
“निवड झालेल्या खेळाडूंनी सप्टेंबरमध्ये भारताविरुद्ध झालेल्या १९ वर्षांखालील मालिकेत आणि पर्थमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या राष्ट्रीय १९ वर्षांखालील स्पर्धेत चांगली कामगिरी केली,” असे ते म्हणाले. ऑस्ट्रेलियाला आयर्लंड, जपान आणि श्रीलंका यांच्यासह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. हा संघ जानेवारीच्या सुरुवातीला नामिबियात पोहोचेल आणि ९ ते १४ जानेवारी दरम्यान सराव सामने खेळेल.
ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षांखालील पुरुष संघ: ऑलिव्हर पीक, कॅसी बार्टन, नदीन कुरे, जेडेन ड्रेपर, बेन गॉर्डन, स्टीव्हन होगन, थॉमस होगन, जॉन जेम्स, चार्ल्स लॅचमंड, विल मलाज्झुक, नितेश सॅम्युअल, हेडन शिलर, आर्यन शर्मा, विल्यम टेलर, अॅलेक्स ली यंग.






