PHOTOS: The history of injuries is long! Not just Pant, but these Indian players who played the field while injured..
ऋषभ पंत : मँचेस्टर कसोटी सामन्यात पहिल्या डावात ऋषभ पंत 37 धावांवर असताना, रिव्हर्स स्वीप शॉट खेळताना 68 व्या षटकात ख्रिस वोक्सचा चेंडू त्याच्या उजव्या पायाला आदळला. त्यामुळे त्याला मोठी दुखापत झाली. तो मालिकेतून बाहेर पडला अशा बातम्या येत असताना. पंत, पुन्हा मैदानात फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि त्याने ५४ धावांची खेळी केली.
ऋषभ पंतने केला विक्रम : मँचेस्टर कसोटी सामन्यात ५४ धावा करताच ऋषभ पंतने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला हे. ऋषभ पंतने भारताचा फलंदाज रोहित शर्माचा २७१६ धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. जखमी असताना देखील त्याने अर्धशतकीय खेळी केली आहे.
कपिल देव : कपिल देव 1980-81 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जखमी झाले होते. या मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात कपिल यांना हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. भारताने पहिल्या डावात भारताने 237 धावा उभारल्या होत्या. प्रत्युउत्तरात ऑस्ट्रेलियाने 419 धावा काढल्या. भारताने दुसऱ्या डावात 324 धावा करून ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 143 धावा ठेवल्या. या सामन्यात कपिल देवने इंजेक्शन घेऊन गोलंदाजी केली आणि 28 धावा देत 5 बळी टिपले. ऑस्ट्रेलिया संघ 83 धावांवर गारद होऊन भारताने हा सामना 59 धावांनी जिंकला.
युवराज सिंग : युवराज सिंगची वनडे वर्ल्डकप 2011 स्पर्धेतील एक आठवणीत राहणारी खेळी आहे. कँसर असताना देखील या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत 362 धावा आणि 15 विकेट देखील घेतल्या होत्या.
रोहित शर्मा : हिटमॅन रोहित शर्माला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात अंगठ्याला मोठी दुखापत झाली असता देखील तो मैदानात उतरला होता. त्याने 28 चेंडूत नाबाद या 51 धावांची खेळी खेळली होती. यामध्ये रोहित शर्माने या खेळीत पाच षटकार आणि तीन चौकार मारले. परंतु, संघाला विजय मिळाला नव्हता.
अनिल कुंबळे : 2002 मध्ये एंटिगा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात जखमी झाला होता. भारताने पहिल्या डावात 9 विकेट गमवून 513 धावा करून डाव घोषित केला होता. या डावात अनिल कुंबलेला मर्वन डिल्लनचा चेंडू थेट जबड्यावर आदळला होता. चेहरा रक्तबंबाळ झाला असताना देखील अनिल कुंबळे हार न मानता गोलंदाजी करत दिग्गज फलंदाज ब्रायन लाराला माघारी पाठवले होते.