
एशियन गेम्स 2026
सेमीफायनलमध्ये पत्करावा लागला पराभव
भारताची स्टार कुराश पट्टू पिंकी बलहाराला सेमीफायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. गोल्ड मेडलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी झालेल्या अटीतटीच्या उपांत्य सामन्यात पिंकी बलहारा हिला दक्षिण कोरियाच्या मो सुमीन हिच्याकडून ०-५ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिचे गोल्ड मेडल जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.
पिंकी बलहारा हिचे एशियन गेम्समधले हे दुसरे पदक ठरले आहे. 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये 52 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर तिने यंदाच्या एशियन गेम्समध्ये पुन्हा आपली कामगिरी फत्ते केली आहे. पिंकीच्या या कामगिरीमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रातून आणि कुराश संघाकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
A bronze for India. A place in history! 🥉🇮🇳 Pincky Balhara becomes the first Indian to win multiple Asian Games medals in Kurash, bringing home India’s third-ever medal in the sport! 👏🔥#AichiNagoya2026 #AsianGames pic.twitter.com/ncRgBUUVRu — Olympic Khel ™ (@OlympicKhel) September 28, 2026
सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाच्या मो सुमीन हिच्या आक्रमक चालींसमोर पिंकीला सावरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई खेळ २०२६ मधील कुराश स्पर्धेत महिलांच्या -७८ किलो वजनी गटात भारताची स्टार खेळाडू पिंकी बलहारा हिचा प्रवास कांस्यपदकावर संपला. सुमीनने उत्तम रणनीती वापरत ५-० अशी आघाडी घेत सामना थेट आपल्या बाजूने फिरवला. तसेच तिने गोल्ड मेडलच्या शर्यतीत प्रवेश केला.
Asian Games 2026: उडी अशी की सगळे झाले अवाक्! Sarvesh Kushare ने घातली ‘रौप्य’पदकाला गवसणी
पिंकी बलहारा हिला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तरी सेमीफायनल गाठल्यामुळे तिला या स्पर्धेत कांस्यपदक जिंकता आले आहे. २०१८ च्या जकार्ता आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या पिंकीचे एशियन गेम्समध्ये हे सलग दुसरे पदक ठरले आहे.