
पंजाबने लखनऊला दिली मात (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
या धावांचा पाठलाग करताना लखनौच्या संघाने खूपच चांगली सुरूवात केली. LSG च्या पहिल्या जोडीने चांगली भागीदारी करत हा विजय मिळविण्याचा प्रयत्न केला. लखनौ सुपर जायंट्स संघात नवीन सलामीची जोडी एडन मार्करामच्या जागी आयुष बडोनी आला आणि मिचेल मार्शसह त्याने चांगली भागीदारी केली. मात्र बडोनी 21 बॉलमध्ये 35 धावा काढून बाद झाला
ऋषभ पंतची खेळी
यानंतर ऋषभ पंतने पंजाबने दिलेलं लक्ष्य गाठायचा पुरेपूर प्रयत्न केला. मार्श आणि पंत या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. दरम्यान युझवेंद्र चहलने अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या अनुभवी असण्याचा योग्य फायदा संघाला करून दिला. १० व्या ओव्हरपर्यंतदेखील लखनौला योग्य लक्ष्य गाठता आलं नव्हतं. ६० बॉल्समध्ये लखनऊच्या संघाला १५३ रन्सची आवश्यकता होती. ऋषभ पंतने त्याच्या खेळीमध्ये खूपच चांगले फटके मारण्याचा प्रयत्न केला. त्याने बॅक टू बॅक सिक्सदेखील एका ओव्हरमध्ये मारल्या. मात्र त्याचा प्रयत्न कमी पडला. ऋषभ पंत ४३ धावांची खेळी करून आऊट झाला.
चहलच्या खात्यात मार्शची विकेट
युझवेंद्र चहलने लखनऊच्या मार्शची महत्त्वाची विकेट काढली आणि तिथूनच संपूर्ण खेळ बदलला. हाच या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. यानंतर ऋषभ पंतने चहलला लागोपाठ दोन सिक्सर मारत आपला इरादा स्पष्ट केला होता. एकहाती सिक्स मारत ऋषभ पंतने मैदानातील चाहत्यांनाही खुष केले. दरम्यान चहलला काहीही करून पंतची विकेट हवी होती आणि या नादात पंजाबचा रिव्ह्यूही फुकट गेला. दरम्यान पूरणचा कॅच ८ धावांवर असताना शशांककडून सुटला. पण पुढच्याच चेंडूवर श्रेयस अय्यरने पूरणचा कॅच घेत आपली फिल्डिंग किती उत्कृष्ट आहे हे दाखवून दिले. १५ व्या ओव्हरमध्ये १३९ धावांवर ४ विकेट अशी लखनऊची अवस्था झाली होती. यानंतर मारक्रमनेदेखील काही वेळ मैदानावर तग धरण्याचा प्रयत्न केला.
शशांक सिंहने सोडले ३ कॅच
पंजाबच्या उपकप्तान शशांक सिंहकडून यावेळी मात्र ढिसाळ क्षेत्ररक्षण दिसले. त्याने या मॅचमध्ये तीन कॅच सोडले. मारक्रमचा महत्त्वाचा कॅचही त्याने यावेळी सोडला. चहलच्या बॉलिंगनवरही शशांकने कॅच सोडला. यावेळी कोच रिकी पाँटिंग मात्र नाराज दिसला. तर दुसऱ्या बाजूला शशांकच्या या फिल्डिंगमुळे श्रेयसला मात्र हसू फुटले. वास्तविक शशांक हा उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. पण त्याच्यासाठी आजचा दिवस अतिशय वाईट ठरला. इतकंच नाही तर विकेटकिपरकडूनही मारक्रमचा कॅच सुटून २-३ वेळा त्याला जीवनदान या मॅचमध्ये मिळाले होते. अखेर स्टॉयनिसने मारक्रमचा झेल घेतला आणि श्रेयसने सुटकेचा निःश्वास सोडला.
PBKS vs LSG Head To Head: पंजाबचा विजयरथ रोखणार का लखनौ? IPL मध्ये असा आहे दोन्ही टीमचा रेकॉर्ड
लखनऊची बिकट अवस्था
टॉस जिंकूनही लखनऊची अवस्था मात्र बिकट झाल्याचे दिसून आले. श्रेयसच्या पंजाब टीमने लखनऊच्या गोलंदाजांना आणि फलंदाजांनाही हैराण करून सोडलं. पुन्हा एकदा या खेळात आपलंच वर्चस्व असल्याचं पंजाबने सिद्ध करत आपले स्थान भक्कम राखून ठेवले आहे. १० गुणांसह पंजाबची टीम गुणतालिकेत सर्वोच्च असल्याचे दिसून आले. पंजाबचा संघ ५५ धावांनी हा सामना जिंकला.