Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ Live : Adam Milneच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज फ्लॉप; ईशान-श्रेयसने सावरला डाव; कीवींसमोर १९२ धावांचं लक्ष्य

IND vs NZ 5th T20 Live Score: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडला १९२ धावांचे आव्हान दिले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 01, 2026 | 02:31 PM
IND vs NZ 5th T20 Live

IND vs NZ 5th T20 Live

Follow Us
Follow Us:
  • अभिषेक-संजू स्वस्तात बाद
  • पण ईशान-श्रेयसची वादळी खेळी
  • भारताने उभारली मोठी धावसंख्या
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज खेळला जात आहे. हा सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ८ विकेट्स गमावून १९१ धावा केल्या. आता, न्यूझीलंडला विजयासाठी १९२ धावांची गरज आहे. शेवटच्या सामन्यात ईशान किशनची बॅट बोलली. त्याने ३२ चेंडूमध्ये ६१ धावा केल्या.

भारतीय संघाने या सामन्यासाठी दोन बदल केले आहेत. भुवनेश्वर कुमार आणि वरुण चक्रवर्ती यांचा अंतिम ११ मध्ये समावेश करण्यात आला, तर मयंक यादव आणि अक्षर पटेल यांना वगळण्यात आले आहे . वैभव सूर्यवंशीला सलग दुसऱ्या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले नाही. दुसरीकडे, न्यूझीलंडने मॅथ्यू फिशरच्या जागी ब्लेअर टिकनरला अंतिम ११ मध्ये स्थान दिले आहे.

PAK vs SL: फखर जमानचा मैदानात धुमाकूळ! श्रीलंकेचा सुपडा साफ करत पाकिस्तानने जिंकली ट्राय सीरिज; भारताच्या विक्रमाशी बरोबरी

ईशान- श्रेयसने वाचवला भारताचा डाव

नाणेफेक गमावून भारत प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने डावाची सुरुवात केली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भारताला पहिला धक्का बसला. ॲडम मिल्नेच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अभिषेक शर्मा विकेटकीपरच्या हाती झेलबाद झाला. अभिषके फक्त १ धाव करुन परतला. त्यानंतर, मिल्नेने सलामीवीर संजू सॅमसनला ४ धावांवर बाद केले.

तिथून पुढे श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावा जोडल्या. मात्र, ब्लेअर टिकनरने ईशानला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. ईशान किशनने ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ३२ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. दरम्यान, श्रेयसने एका बाजूने शानदार खेळ करत २२ चेंडूंमध्ये आपल्या ५० धावा पूर्ण केल्या. मात्र, अर्धशतक पूर्ण केल्यावर लगेचच तो बाद झाला. नॅथन स्मिथने कर्णधार श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. त्यानंतर, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या तिलक वर्मा देखील ५ धावांवर स्वस्तात बाद झाला. नॅथन स्मिथने त्याची विकेट घेतली.

भारताची नमन धीरच्या रूपाने सहावी विकेट पडली. टिकनरने धीरला ३३ धावांवर बाद केले. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि एक षटकार मारला. यानंतर, शेवटच्या षटकात नितीश रेड्डील २२ धावा करुन अॅडम मिल्नेच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर लगेचच, भुनेश्वर कुमार देखील ४ चेंडूमध्ये ६ धावा करुन तंबूत परतला. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्नेने सर्वाधिक ४ विकेट्स घेतले. तर, ब्लेअर टिकनर आणि नॅथन स्मिथ यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले.

दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश रेड्डी, नमन धीर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड: फिन ऍलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेवन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, ऍडम मिल्ने, जेकब डफी, ब्लेअर टिकनर.

IND vs NZ: हॅमिल्टनमध्ये धावांचा महापूर की गोलंदाज उडवणार दांड्या? सेडन पार्कवर कोणाचा दबदबा; पाहा Pitch Report

Web Title: Ind vs nz 5th t20 hamilton live india sets 192 run target adam milne 4 wickets pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Ishan Kishan
  • Mitchell Santner
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs NZ: रोहित-विराटची जोडी पुन्हा धुरळा उडवणार! न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया सज्ज; पाहा संपूर्ण वेळापत्रक
1

IND vs NZ: रोहित-विराटची जोडी पुन्हा धुरळा उडवणार! न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया सज्ज; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Ishan Kishan : ईशान किशनने रचला टी-20 मध्ये इतिहास; असं करत त्याने अनेकांना मागे सारलं
2

Ishan Kishan : ईशान किशनने रचला टी-20 मध्ये इतिहास; असं करत त्याने अनेकांना मागे सारलं

IND vs NZ: हॅमिल्टनमध्ये धावांचा महापूर की गोलंदाज उडवणार दांड्या? सेडन पार्कवर कोणाचा दबदबा; पाहा Pitch Report
3

IND vs NZ: हॅमिल्टनमध्ये धावांचा महापूर की गोलंदाज उडवणार दांड्या? सेडन पार्कवर कोणाचा दबदबा; पाहा Pitch Report

WTC Points Table मध्ये टीम इंडियाची बल्ले-बल्ले! वेस्ट इंडिजने बांग्लादेशला दिला धक्का, भारताचा थेट ‘या’ क्रमांकावर कब्जा
4

WTC Points Table मध्ये टीम इंडियाची बल्ले-बल्ले! वेस्ट इंडिजने बांग्लादेशला दिला धक्का, भारताचा थेट ‘या’ क्रमांकावर कब्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.