Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या ‘गोल्डन गर्ल्स’; श्रीलंकेचा 147 रन्सने सणसणीत पराभव; PM Modi यांनी दिल्या ‘या’ खास शुभेच्छा

Asian Games: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या सुवर्ण कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या शानदार विजयाचे कौतुक करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2026 | 05:25 PM
एशियन गेम्स 2026

एशियन गेम्स 2026

Follow Us
Follow Us:
  • गोल्ड मेडल जिंकताच मोदींकडून भारतीय संघाला शुभेच्छा
  • भारतीय संघाने एशियन गेम्समध्ये मिळवला विजय 
  • श्रीलंकेचा केला 147 रन्सने दारुण पराभव 
Asian Games 2026: सध्या जपानमध्ये एशियन गेम्स स्पर्धा सुरू आहे. यामध्ये आज भारत महिला संघ आणि श्रीलंका महिला संघ यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला. भारतीय महिला संघाने श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करत 217 रन्सचे टार्गेट दिले होते. त्यासमोर श्रीलंकेचा संघ 69 रन्सवर ऑल आउट झाला. भारताने एशियाम गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. यानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

एशियन गेम्स 2026 मध्ये भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अंतिम सामन्यातील 147 धावांचा विजय हा भारतीय संघाच्या वर्चस्वाची साक्ष देणारा ठरला. महिला क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरातून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विजयाचे कौतुक केले जात आहे.

Asian Games: भारताच्या वाघिणींसमोर श्रीलंका उद्ध्वस्त; 147 रन्सने केला पराभव अन् जिंकले Gold Medal

या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करायला लावला. भारतीय गोलंदाजांनी सातत्याने दबाव कायम ठेवला आणि श्रीलंकेच्या फलंदाजांना 69 रन्सवर ऑल आउट केले. एशियन गेम्ससारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या सुवर्ण कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या शानदार विजयाचे कौतुक करण्यात आले आहे.

A splendid triumph for Indian cricket! Heartiest congratulations to our Women’s Cricket Team on winning the Gold medal at the Asian Games. It was a commanding performance at the Games, marked by confidence, skill and wonderful teamwork. This victory also brings India its first… pic.twitter.com/oZI9Uoyp6I — PMO India (@PMOIndia) September 22, 2026

पंतप्रधान कार्यालयाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय क्रिकेटसाठी ही शानदार कामगिरी आहे. एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यात आले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने मिळवलेले हे सुवर्णपदक केवळ एका सामन्याचा विजय नसून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय महिला क्रिकेटची वाढती ताकद अधोरेखित करणारे यश ठरले आहे.

IND W vs SL W Final: शेफाली-स्मृतीचा धडाका, भारताने फायनलमध्ये उभा केला धावांचा डोंगर, रचला इतिहास

Web Title: Pm narendra modi best wishes to ind w team gold medal in asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • IND W vs SL W
  • Indian Women Cricket Team
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Asian Games: भारताच्या वाघिणींसमोर श्रीलंका उद्ध्वस्त; 147 रन्सने केला पराभव अन् जिंकले Gold Medal
1

Asian Games: भारताच्या वाघिणींसमोर श्रीलंका उद्ध्वस्त; 147 रन्सने केला पराभव अन् जिंकले Gold Medal

IND W vs SL W Final: शेफाली-स्मृतीचा धडाका, भारताने फायनलमध्ये उभा केला धावांचा डोंगर, रचला इतिहास
2

IND W vs SL W Final: शेफाली-स्मृतीचा धडाका, भारताने फायनलमध्ये उभा केला धावांचा डोंगर, रचला इतिहास

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
3

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Asian Games 2026: फायनलचा थरार रंगणार! सुवर्णपदकासाठी भारत-श्रीलंकेची हाय-व्होल्टेज टक्कर; ‘या’ दिवशी भिडणार
4

Asian Games 2026: फायनलचा थरार रंगणार! सुवर्णपदकासाठी भारत-श्रीलंकेची हाय-व्होल्टेज टक्कर; ‘या’ दिवशी भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.