Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रज्ञानंद ठरला नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय; अंतिम सामन्यात जर्मनीच्या व्हिन्सेंटचा केला पराभव

फ्रान्सचा अलीरेझा फिरौजा १५.५ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला. मॅग्नस कार्लसेनने अंतिम फेरीत गुकेशला हरवले, पण त्यालाही विजेतेपद जिंकता आले नाही. कार्लसेन १३ गुणांसह पाचव्या स्थानी राहिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 06, 2026 | 08:39 AM
प्रज्ञानंद ठरला नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय; अंतिम सामन्यात जर्मनीच्या व्हिन्सेंटचा केला पराभव

प्रज्ञानंद ठरला नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय; अंतिम सामन्यात जर्मनीच्या व्हिन्सेंटचा केला पराभव

Follow Us
Follow Us:

ओस्लो : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद याने नॉर्वे बुद्धिबळ २०२६ चे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. हा २० वर्षीय खेळाडू ही स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंटला पराभूत केल्याचे पाहिला मिळाले. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कार्लसेनला दोनदा हरवले. आता प्रज्ञानानंद याने नॉर्वे बुद्धिबळ २०२६ चे विजेतेपद जिंकले आहे.

आर. प्रज्ञानानंद याने अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरला पराभूत करून ही कामगिरी केली. स्पर्धेच्या अंतिम दिवशी, प्रज्ञानानंद १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. त्याने क्लासिकल सामना जिंकून ३ गुण मिळवले आणि एकूण १८ गुणांसह विजेतेपद निश्चित केले. अमेरिकन ग्रँडमास्टर वेस्ली सो अंतिम फेरीत १५.५ गुणांसह स्पर्धेत आघाडीवर होता. मात्र, त्यांचा सामना अनिर्णित राहिला आणि निर्णय आर्मागेडॉन टायब्रेकरवर गेला. यामुळे प्रज्ञानंदला विजेतेपद जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला. वेस्ली सो ने टायब्रेकर जिंकला, पण त्याला फक्त १.५ गुण मिळाले. यामुळे त्याचे एकूण १७ गुण झाले, जे प्रज्ञानंदपेक्षा एकने कमी होते.

IND Vs AFG : एक मॅच खेळायची अन् ६ महिने बसायचं?; ICC च्या अजब वेळापत्रकावर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक भडकला…

फ्रान्सचा अलीरेझा फिरौजा १५.५ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला. मॅग्नस कार्लसेनने अंतिम फेरीत गुकेशला हरवले, पण त्यालाही विजेतेपद जिंकता आले नाही. कार्लसेन १३ गुणांसह पाचव्या स्थानी राहिला. प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कार्लसेनला दोनदा हरवले.

प्रज्ञानंदची कामगिरी साधारण पण…

या स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रज्ञानंदची कामगिरी साधारण होती, पण नंतरच्या सामन्यांमध्ये त्याने उल्लेखनीय पुनरागमन केले. त्याच्या सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक म्हणजे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आणि सात वेळा नॉर्वेजियन बुद्धिबळ चॅम्पियन राहिलेल्या मॅग्नस कार्लसेनला क्लासिकल सामन्यांमध्ये दोनदा हरवणे. एकाच स्पर्धेत मॅग्नस कार्लसेनला दोनदा हरवणारा प्रज्ञानंद हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी, २००७ मध्ये विश्वनाथन आनंदने लिनारेस आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कार्लसेनला सलग दोन सामन्यांमध्ये पराभूत केले होते.

आनंद-गुकेश यांना नॉर्वे चेसचे विजेतेपदही नाही

आनंद आणि गुकेश यांना नॉर्वे चेसचे विजेतेपदही जिंकता आले नाही. जे भारतीय बुद्धिबळ दिग्गज विश्वनाथन आनंदलाही साधता आले नव्हते, ते प्रज्ञानंदने साध्य केले. विद्यमान विश्वविजेता डी. गुकेशलाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. २०१३ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. प्रज्ञानंद दुसऱ्यांदा नॉर्वे चेसमध्ये खेळत होता. गुकेश ८ गुणांसह सहाव्या (शेवटच्या) स्थानावर राहिला.

Web Title: Praggnanandhaa becomes the first indian to win the norway chess title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • Norway Chess 2025
  • R Praggnanandhaa
  • Sports

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.