Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Carrom Tournament : बालदिनी रंगणार शालेय कॅरमचा डाव; प्रल्हाद नलावडे स्मृती स्पर्धेत मोफत प्रवेश

Carrom Tournament : कांदिवली पश्चिम येथे 14 नोव्हेंबरला प्रल्हाद नलावडे स्मृती सहावी शालेय कॅरम स्पर्धा होणार आहे. 14 वर्षांखालील मुला-मुलींसाठी स्पर्धा विनामूल्य असून 9 नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 08, 2026 | 09:10 PM
Carrom Tournament : बालदिनी रंगणार शालेय कॅरमचा डाव; प्रल्हाद नलावडे स्मृती स्पर्धेत मोफत प्रवेश

Carrom Tournament : बालदिनी रंगणार शालेय कॅरमचा डाव; प्रल्हाद नलावडे स्मृती स्पर्धेत मोफत प्रवेश

Follow Us
Follow Us:
  • प्रल्हाद नलावडे यांच्या स्मृती जपण्याचा उपक्रम
  • विद्यार्थ्यांना विनामूल्य सहभागाची संधी
  • 14 वर्षांखालील मुलांसाठी विनामुल्य स्पर्धा
 

बालदिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कांदिवली पश्चिम येथे सहाव्या प्रल्हाद नलावडे स्मृती शालेय कॅरम स्पर्धेचे (Carrom Tournament) आयोजन करण्यात आले आहे. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, शशिकला फाउंडेशन आणि अविनाश नलावडे स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा होणार आहे. 14 वर्षांखालील शालेय मुला-मुलींसाठी ही स्पर्धा विनामूल्य खुली असून, स्पर्धेतील 8 विजेत्यांना आकर्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

साईनगर, कांदिवली पश्चिम येथील मुंबई पब्लिक स्कूलच्या सभागृहात स्पर्धेचे सामने खेळवले जातील. या स्पर्धेत शालेय मुला-मुलींसाठी एकेरी कॅरम प्रकार ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणि स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

प्रल्हाद नलावडे यांच्या स्मृती जपण्याचा उपक्रम

कॅरमप्रेमी स्वर्गीय प्रल्हाद नलावडे यांनी नवोदित आणि उदयोन्मुख कॅरमपटूंना नेहमीच प्रोत्साहन दिले. 2019 मध्ये आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित पहिल्या महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत सहभागी झालेल्या दोनशेहून अधिक खेळाडूंना त्यांनी मोफत स्ट्रायकर भेट दिले होते. विद्यार्थ्यांना कॅरम खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि नव्या खेळाडूंना आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, हा त्यामागील उद्देश होता.

त्यांच्या याच क्रीडाप्रेमी वृत्तीची आठवण जपण्यासाठी प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय कॅरम स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेचे सहावे वर्ष असून, उपक्रमाचे सातत्य टिकवण्यासाठी संयोजक लीलाधर चव्हाण आणि रामेश्वर लोहे विशेष प्रयत्न करीत आहेत.

Maharashtra Open : बॅडमिंटनचा राज्यस्तरीय थरार! १२ नोव्हेंबरपासून बॉम्बे जिमखान्यावर महाराष्ट्र ओपन स्पर्धा

विद्यार्थ्यांना विनामूल्य सहभागाची संधी

14 वर्षांखालील शालेय मुला-मुलींना या स्पर्धेत कोणतेही प्रवेश शुल्क न भरता सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज आणि अधिक माहितीसाठी सहसचिव ओमकार चव्हाण किंवा संतोष जाधव यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख 9 नोव्हेंबर असून, इच्छुक खेळाडूंनी मुदतीपूर्वी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

IPL 2027 लिलावाआधी ट्विस्ट! Mumbai – Punjab मध्ये पडद्यामागे सर्वात मोठी डील; हार्दिक-अर्शदीपच्या ट्रेडवर शिक्कामोर्तब होणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रल्हाद नलावडे स्मृती शालेय कॅरम स्पर्धा कधी होणार आहे?

    Ans: ही स्पर्धा १४ नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त आयोजित करण्यात आली आहे.

  • Que: स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे?

    Ans: साईनगर, कांदिवली पश्चिम येथील मुंबई पब्लिक स्कूलच्या सभागृहात स्पर्धा होणार आहे.

  • Que: स्पर्धेतील विजेत्यांना कोणते पुरस्कार मिळणार आहेत?

    Ans: स्पर्धेतील आठ विजेत्यांना आकर्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Web Title: Prahlad nalawade memorial school carrom tournament kandivali rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 09:10 PM

Topics:  

  • Kandivali
  • Sports
  • tournament

संबंधित बातम्या

Maharashtra Open : बॅडमिंटनचा राज्यस्तरीय थरार! १२ नोव्हेंबरपासून बॉम्बे जिमखान्यावर महाराष्ट्र ओपन स्पर्धा
1

Maharashtra Open : बॅडमिंटनचा राज्यस्तरीय थरार! १२ नोव्हेंबरपासून बॉम्बे जिमखान्यावर महाराष्ट्र ओपन स्पर्धा

Kandivali Chain Snatching : डिलिव्हरी बॉयच्या वेशात आला, पत्ता विचारण्याचा बहाणा अन् सोनसाखळी हिसकावली
2

Kandivali Chain Snatching : डिलिव्हरी बॉयच्या वेशात आला, पत्ता विचारण्याचा बहाणा अन् सोनसाखळी हिसकावली

Lionel Messi : मेस्सीची जादू, इंटर मियामीचा न्यू इंग्लंडवर दणदणीत विजय
3

Lionel Messi : मेस्सीची जादू, इंटर मियामीचा न्यू इंग्लंडवर दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.