Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीलम गोऱ्हे यांचे DCM सुनेत्रा पवारांना निवेदन; जिल्हा नियोजन आराखड्यात विशेष तरतुदी करण्याची मागणी

जिल्हा नियोजन आराखड्यात विशेष तरतुदी करण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 12, 2026 | 04:43 PM
Neelam Gorhe representation to Sunetra Pawar for development works in Pune District Planning Plan

Neelam Gorhe representation to Sunetra Pawar for development works in Pune District Planning Plan

Follow Us
Follow Us:
  • नीलम गोऱ्हे यांचे पालकमंत्री सुनेत्रा पवारांना निवेदन
  • सर्वांगीण विकास आणि SDG २०३० राबविण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पीय अधिवेशनात बैठकीची मागणी
  • मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी विशेष निधीची मागणी
पुणे :  आज (दि.12 फेब्रुवारी) पुणे विभागीय कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. याबैठकीत पुणे जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेत शाश्वत विकास ध्येये (SDG २०३०) साध्य करण्यासाठी जिल्हा नियोजन आराखड्यात विशेष तरतुदी करण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केली. याबाबतचे सविस्तर निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे सादर केले आहे.

या निवेदनात ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा निर्देशक आराखडा तयार करून प्रगती मापन अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच रस्ते सुरक्षा, मेट्रो विस्तार, आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी, आरोग्य व्यवस्था आणि मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी विशेष निधी आणि उपाययोजनांची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

हे देखील वाचा : अजितदादांना मुद्दामून सहीसाठी थांबवून ठेवण्यात आला अन् विमान प्रवास; रोहित पवारांचा मोठा संशय

याशिवाय पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास आणि SDG २०३० राबविण्याच्या दृष्टीने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व जिल्हयातील सर्व आमदार यांची मुंबईत विशेष बैठक घेण्यात यावी, अशी सूचना देखील डॉ. गोऱ्हे यांनी केली.

बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी दलितवस्ती सुधारणा निधी अखर्चित राहिल्याचे नमूद करून महसूल विभागाकडून सर्व निर्णयांची माहिती सादर करण्याची मागणी केली. विशेष गहन पुनरीक्षण (SIR) मोहीम व जातिनिहाय जनगणना कशा पद्धतीने होणार याची कार्यप्रणाली जाहीर करावी. SDG साठी ३ टक्के निधी जिल्हा नियोजन मधून खर्च करण्यात येत असतो तो कोणत्या योजनांसाठी व कोणत्या घटकांसाठी खर्च केला आहे त्याचे सादरीकरण करण्याची डॉ.गोऱ्हे यांनी सूचना केली.

हे देखील वाचा :  मोठी बातमी ! पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या 69 कार्यकर्त्यांवर भाजपकडून कारवाई; थेट सहा वर्षांसाठी…

महिला सक्षमीकरणासाठी अधिक तरतुदी कराव्यात अशा इतर सूचनाही त्यांनी मांडल्या. केंद्र सरकारच्या ‘सखी’ (वन स्टॉप सेंटर) योजनेच्या केंद्रांना भेट देऊन पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठक सुरू होण्यापूर्वी सभागृहात विविध मान्यवरांनी दिवंगत नेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी अजितदादा कामकाजात अत्यंत दक्ष असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रेझेंटेशनवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. दादांच्या स्मारकासाठी जिल्हा नियोजनमध्ये तरतुद करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दादांच्या अचानक निधनाने तीव्र दुःख झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Rohit pawar press conference on ajit pawar accident 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • Neelam Gorhe
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
1

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’
2

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार
3

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार

Tukaram Mundhe यांच्या विभागाचा कारवाईचा बडगा; १२ हजार २७८ लिटर दूध नष्ट, अन्न परवाने निलंबित
4

Tukaram Mundhe यांच्या विभागाचा कारवाईचा बडगा; १२ हजार २७८ लिटर दूध नष्ट, अन्न परवाने निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.