
सिंगापूर : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने (PV Sindhu) सिंगापूर ओपनच्या (Singapore Open Super 500) फायनलपर्यंत (Final) धडक मारली आहे. तिने सेमी फायनलमध्ये जपानच्या साईना कावाकामीचा (Saina Kawakami) पराभव केला. सिंधूने हा सामना २१-१५, २१-७ असा सरळ गेममध्ये जिंकला. या हंगामात सिंधूने सयेद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा (Syed Modi International Competition) आणि स्विस ओपन (Swiss Open) अशी दोन सुपर ३०० टायटल जिंकली आहेत.
कावाकामी विरूद्धच्या हेड टू हेड सामन्यात सिंधू २-० ने आघाडीवर होती. कावाकामी सोबत ती २०१८ मध्ये चायना ओपनमध्ये खेळली होती. कावाकामीने २०१९ मध्ये ऑरलान्स मास्टर जिंकली होती. तर स्विस ओपनमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती.
[read_also content=”आयएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कप स्पर्धा : भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरचा सुवर्णवेध https://www.navarashtra.com/sports/in-issf-shooting-world-cup-indias-aishwarya-pratap-singh-tomar-wins[read_also content=”आयएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कप स्पर्धा : भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरचा सुवर्णवेध https://www.navarashtra.com/sports/in-issf-shooting-world-cup-indias-aishwarya-pratap-singh-tomar-wins-gold-nrgm-304856/”]-gold-nrgm-304856/”]
हैदराबादच्या या स्टार बॅडमिंटनपटूने या वर्षीच्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये (Asian Championship) कांस्य पदकाचीदेखील कमाई केली होती. आता ती २०२२ मध्ये आपल्या पहिल्या वहिल्या सुपर ५०० टायटलच्या अगदी जवळ पोहचली आहे. जपानच्या एया ओहोरी आणि चीनच्या वांग झी यी यांच्यातील सेमी फायनलमध्ये जिंकणारी तिच्यासोबत सिंधू फायनलमध्ये भिडणार आहे.
Opening semifinals match sees Saena Kawakami ?? challenge Pusarla V. Sindhu ??.#BWFWorldTour #SingaporeOpen2022 pic.twitter.com/jQKrOYIWKA — BWF (@bwfmedia) July 16, 2022